Suryakumar yadav Fans song : इंदूरमध्ये न्यूझीलंड विरूद्ध भारत (IND vs NZ) यांच्यातील तिसरा वनडे सामना खेळवण्यात आला. भारताने 90 रन्सने हा सामना जिंकून सिरीजही जिंकली. दरम्यान या सामन्यामध्ये टी-20 क्रिकेटचा किंग सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) फारसा चांगला खेळ करता आला नाही. मात्र होळकर स्टेडियममध्ये चाहत्यांनी सूर्याला एक मोठं सरप्राईज दिलं. फॅन्सने सूर्यासाठी खास गाणं तयार केलं होतं. इतकंच नाही तर सूर्यकुमार फिल्डींग करत असताना त्यांनी हे गाणं सूर्याला ऐकवलं देखील.


'जिने मेरा दिल लुटीया, सूर्या'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरूद्धची तिसरी वनडे टीम इंडियाने जिंकली. दरम्यान न्यूझीलंड फलंदाजी करत असताना सूर्यकुमार फिल्डींगसाठी करत होता. सूर्या बाऊंड्री लाईनला फिल्डींग करायला आला असताना, चाहत्यांना त्याच्यासाठी तयार केलेलं गाणं म्हटलं. या गाण्याचे बोल, 'जिने मेरा दिल लुटीया, सूर्या...जिने मेनू मार सुटीया सूर्या...' असे होते.



सूर्यालाही आवडलं गाणं


चाहत्यांनी सूर्याला हे गाणं ऐकवल्यानंतर त्याला देखील ते खूप आवडलं. त्यानेही टाळ्या वाजवून चाहत्यांना प्रतिसाद दिला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.


ICC कडून सूर्याचा मोठा सन्मान


गेल्या वर्षी टी20 क्रिकेटमध्ये तुफानी फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचा आयसीसीकडून (ICC) हा मोठा सन्मान करण्यात आला आहे. आयसीसी 'टी20 क्रिकेटर ऑफ द इयर'च्या शर्यतीत सूर्यकुमार यादवबरोबर सॅम करन (Sam Curran), झिम्बाव्बेचा सिकंदर रजा (Sikandar Raza) आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (Mohammed Rizwan) यांचा समावेश होता. पण सर्वांनावर सूर्यकुमार यादवने मात केली आहे. सूर्यकुमार यादव टी20 फॉर्मेटमध्ये अव्वल स्थानावर आहे. 


2022 मध्ये सूर्यकुमार यादवचा जलवा


क्रिकेट जगतात 2022 हे वर्ष  खऱ्या अर्थाने सूर्यकुमार यादवचं होतं. या वर्षात खेळलेल्या 31 सामन्यांमध्ये सूर्याने तब्बल 1164 धावा केल्या. त्याचा स्ट्राईकरेट होता 187.43 इतका. इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा हा स्ट्राईकरेट खूप वरचढ आहे. एका वर्षात टी20 क्रिकेटमध्ये हजाराहून अधिक धावा करणारा सूर्यकुमार यादव हा पहिला भारतीय खेळाडू आहे.