Suryakumar Yadav AUS vs IND : ऑस्ट्रेलिया आणि भारत (Australia vs India) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूंच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. सुरूवातील शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या धमाकेदार शतकाने ऑस्ट्रेलियाचा बाजार उठला. त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने 24 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. त्यात 3 फोर अन् 5 सिक्सचा समावेश आहे. आजच्या सामन्यात सूर्यकुमारने कॅमरून ग्रीनला तोडून काढला. सूर्याने 44 व्या ओव्हरमध्ये ग्रीनला भरदिवसा चांदण्या दाखवल्या. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, भारताच्या इनिंगच्या 44 व्या ओव्हरमध्ये  कॅमरून ग्रीन गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. त्यावेळी सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल मैदानात होता. सूर्यकुमार यादवने सुरूवात हळू केली पण बॉल चांगला दिसू लागताच आक्रमण सुरू केलं. कॅमरून ग्रीनच्या 44 व्या ओव्हरमध्ये त्याने सलग 4 सिक्स मारले. त्यामुळे ग्रीनच्या बत्त्या गुल झाल्या होत्या. त्यानंतर ग्रीनने 5 वा बॉल हुकवला. त्यामुळे ग्रीनने सुटकेला श्वास घेतला. मात्र, सुर्याची फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियाचा घाम फुटला होता, हे नक्की..


पाहा Video



दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या 10 ओव्हरमध्येच सामन्याचं चित्र दाखवलं. श्रेयस अय्यरने आक्रमण सुरू केलं अन् अर्धशतक झळकावलं. त्यानंतर श्रेयर आणि शुभमन या दोघांनी शतक ठोकलं अन् टीम इंडियाला मोठी मजल मारून दिली. भारताने पहिल्या डावात 399 धावा केल्या आहेत. वनडे इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.


आणखी वाचा - IND vs AUS : शुभमनच्या खणखणीत सिक्स पाहून श्रेयस अय्यरही झाला शॉक, पाहा Video


टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (C), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.


ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (C), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (WK), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.