आला रे! मुंबईच्या टीममध्ये आज `या` खेळाडूचं होणार कमबॅक
आजच्या सामन्याअगोदरच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
मुंबई : आयपीएलमध्ये आज दोन सामने रंगणार आहेत. यामध्ये पहिला म्हणजेच दुपारचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये रंगणार आहे. या सामन्याअगोदरच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव टीमच्या निवडीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे राजस्थाविरूद्धच्या सामन्यात त्याचा टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.
दोन्ही टीममध्ये दिसून येणार बदल
दिल्लीविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अनमोलप्रीत सिंगच्या जागी आजच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला खेळवला संधी मिळू शकते. दिल्लीविरूद्ध तिलक वर्माने चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे राजस्थानविरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये अजून कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.
राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये एक बदल पाहायला मिळू शकतो. हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात राजस्थानने मोठ्या विजयाची नोंद केली होती. या सामन्यात नॅथन कुल्टर-नाईल शेवटच्या ओव्हरमध्ये दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे यावेळी राजस्थान त्याच्या जागी जिमी नीशमचा टीममध्ये समावेश करू शकते.
मुंबई आणि राजस्थानची संभाव्य प्लेईंग 11
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्धाव आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमेयर, रियान पराग, जिमी नीशम, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, किरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बासिल थंपी