मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आपली प्रतिभा सिद्ध केलीये. याशिवाय त्याच्याकडे आणखी एक असलेली प्रतिभा म्हणजे भविष्यवाणी. नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्यात (IND vs AUS 2nd T20I) त्याने याची झलक दाखवली. सामना सुरू होण्यापूर्वी त्याने जसं म्हटलं होतं, अगदी तसंच घडलं.


भारताने मालिकेत बरोबरी साधली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरातील पावसाने ग्रासलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने चांगली कामगिरी करत विजयाची नोंद केली. यासह तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवार 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आठ ओव्हरर्समध्ये पाच गडी गमावून 91 रन्स केले. यानंतर भारतीय संघाने 7.2 ओव्हरर्समध्ये लक्ष्य गाठलं.


सामन्यापूर्वी अंदाज बांधला गेला


या सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट चालली नाही आणि तो खातं न उघडता अॅडम झंपाचा बळी ठरला. त्याला विजयाचा विश्वास असला आणि सामना सुरू होण्यापूर्वी त्याने हेच सांगितलं होतं.



सामन्यापूर्वी मुरली कार्तिकने सूर्यकुमारला विचारलं की, तू नंबर 1 टी-20 टीमसोबत असायला हवं आणि सध्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहेस, आज काय वाटतं?


या प्रश्नाचं उत्तर देताना सुर्यकुमार यादव म्हणाला, 'आज रात्री 1-1.' हे पाहून मुरलीही थोडं आश्चर्यचकित झाला आणि काही वेळ बोलू शकला नाही. 


यानंतर मुरली कार्तिक म्हणाला, 'फुलस्टॉप. तुझा उत्साह पाहून आनंद झाला. तू सामन्यात चांगली कामगिरी करशील.