MI vs RCB Highlights IPL 2023 : मुंबई इंडियन्स विरूद्ध आरसीबी (Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore) ही मॅच टफ होईल, असं सर्वांनाच वाटत होतं. बंगळुरूने मुंबईविरुद्ध शड्डूच ठोकले होते. मुंबईच्या वानखेडेवर झालेल्या या सामन्यात आरसीबीच्या डुप्लेसिसने (Faf du Plessis) सुत्र हातात घेतली आणि मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) साथीने बेछुट मारा केला. डुप्लेसिसने 65 तर मॅक्सवेलने 68 धावांची खेळी केली. तर कार्तिकने अखेरीस येऊन 18 बॉलमध्ये 30 धावा करत हात साफ करून घेतला. आरसीबीने पलटणसमोर 200 चं लक्ष ठेवलं. सिराज, हेजलवूड आणि हसरंगा समोर मुंबई नांगी टाकणार असं सर्वांनाच वाटलं होतं. मात्र, मुंबईचे फॅनच्या आशा होत्या, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यावर. सूर्याने चाहत्यांचा विश्वास कमी होऊ दिला नाही आणि 35 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 7 फोरच्या मदतीने अंदाधुंद 83 धावांची खेळी केली आणि मुंबईच्या वाटेला यशाचं सुख लाभून दिलं. गेल्या काही दिवसात सूर्या पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचं दिसून येतंय. सूर्यकुमार अचानक सेहवाग मोडमध्ये कसा आला? असा अनेकांना प्रश्न देखील पडतोय. त्यावर आता सूर्याने स्वत: यावर खुलासा केला आहे.


काय म्हणाला Suryakumar Yadav?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या सामन्यात मी अनेकदा 7 ते 15 या ओव्हरमध्ये खेळायला येतो. यावर मी नेटमध्ये खूप प्रॅक्टिस केलीये की नेमका बॉल कसा येईल आणि मला कसा खेळायचाय. मला जास्तीत जास्त धावा कशा बनवायच्यात, यावर मी स्वत:शी बोलून घेतो. नेटमध्ये खेळताना मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन खेळण्याच्या प्रयत्नात असतो. तसेच स्वत:वर प्रेशर घेण्याचा प्रयत्न करतो. त्याठिकाणी मला बॉन्ड्रीज मिळण्याची शक्यता असते. तिथंच मी बॉल मारण्याचा प्रयत्न करतो, असं म्हणत सूर्याने यशाचं गुपित सांगितलंय.


आणखी वाचा - अपना सूर्या फिर चमकेगा…", खचलेल्या 'सूर्या'च्या बचावासाठी सिक्सर सिंग मैदानात!


बंगळुरूची एक विशिष्ट पद्धतीने खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. आरसीबी आमच्याविरुद्ध आम्ही स्लो बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. माझं नेहालसोबत बोलणं झालं, की स्लो बॉल आले तर धावा कशा काढायच्या. त्यावेळी आम्ही फक्त गॅप्स शोधण्याचा प्रयत्न करत होतो. त्यासाठी आम्ही पळून धावा जास्त काढण्याचा प्रयत्न केला आणि खराब चेंडूवर चौकार मिळवण्याचा प्रयत्न केला, असा खुलासा देखील सूर्यकुमार यादवने केला आहे.



दरम्यान, बंगळुरविरुद्ध सामना जिंकून मुंबई इंडियन्सने थेट 12 अंकासह तिसऱ्या स्थानी (IPL Points Table) झेप घेतली आहे. कोणाला विश्वास बसणार नाही, अशी कामगिरी मुंबईच्या खेळाडूंकडून पहायला मिळत आहे. 11 सामन्यात 6 विजय नोंदवून मुंबईची लोकल सुपरफास्ट झाल्याचं दिसतंय. मात्र, आता आगामी सामने अतीतटीचे होणार असून मुंबई या सामन्यात विजयी रथ  खेचून प्लेऑफपर्यंत (IPL Playoffs) नेणार का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.