मुंबई : ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. याआधी भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 सिरीज खेळणार आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेकडूनही मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव या जागतिक स्पर्धेसाठी आपण विशेष तयारी करतोय.


मिडिल ऑर्डरमध्ये खेळणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली हे पहिल्यापासूनच टॉप-3 फलंदाज आहेत. दरम्यान, टीम इंडियाच्या फलंदाजीच्या मधल्या फळीवर नियंत्रण ठेवण्याची मोठी जबाबदारी सूर्यकुमार यादववर असणार आहे. त्यामुळे तो कोणतीही कसर सोडणार नाही. या आगामी मेगा-टूर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे.


सूर्यकुमार यादव यांनी एका इंग्रजी वेबसाईटशी संवाद साधताना म्हणाला की, "मी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. मी कर्णधार रोहितशी खूप बोललो आहे. यादरम्यान खेळपट्टी आणि चेंडूबाबत बरीच चर्चा केली. मला फास्ट ट्रॅकवर खेळण्याचा आनंद आहे, मला वाटतं की, माझा खेळ वेगवान आणि बाऊंसच्या विकेटसाठी अनुकूल आहे.


सुर्यकुमार करतोय खास तयारी


या मेगा-टूर्नामेंटसाठी सूर्यकुमार विशेष तयारी करतोय. तो म्हणाला, "मैदानाचा आकार हे मोठं आव्हान असणार आहे. त्याठिकाणी आपण हुशार असणं आवश्यक आहे. मी त्यानुसार तयारी करतोय आणि विकेटसमोर आणखी फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. आशा आहे की मी माझ्या खेळात त्याचा समावेश करू शकेन."