मुंबई : दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत क्लीन स्वीप देण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पाहुण्या टीमने भारताचा पराभव केला. यासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा स्काय म्हणजेच सूर्यकुमार यादवकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र तो 8 रन्सवर माघारी परतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवला 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरवण्यात आलं होतं. तर चौथ्या क्रमांकावर दिनेश कार्तिकला उतरवण्यात आलं होतं. दरम्यान सामना संपल्यानंतर सूर्याने त्याच्या फलंदाजी क्रमांकावर मोठं वक्तव्य केलं आहे.


तिसरा सामना संपल्यानंतर सूर्यकुमारला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून गौरवण्यात आलं. यादरम्यान तो म्हणाला, "मला आकडे दिसत नाहीत पण मला वाटतं की आणखी रन्स करण्याची गरज होती. माझ्या मित्रांनी मला व्हॉट्सअॅपवर आकडेवारी आणि नंबर पाठवले पण मी फारसं लक्ष दिलं नाही. मला फक्त खेळाचा आनंद घ्यायचा होता."


शेवटच्या T20 मधील पराभवाबद्दल सूर्यकुमार म्हणाला, 'मी आज मोठी खेळी करू शकलो नाही. डीकेने जबरदस्त खेळ दाखवला. दिनेश कार्तिकने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे माझा फलंदाजीचा चौथा क्रमांक धोक्यात आला आहे. मी याबद्दल फारसा विचार केला नसला तरी काहीतरी करावं लागेल.


तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "एक संघ म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत होतो की, निकाल काहीही असो, सुधारणा झाली पाहिजे. पॉवरप्ले, मिडल ओव्हर्स आणि डेथ ओव्हर्समध्ये आणखी कोणते पर्याय मिळू शकतात हे पाहण्यासाठी आम्हाला आमच्या गोलंदाजीकडे लक्ष द्यावं लागेल."