Suryakumar Yadav on Rohit Sharma : इंडियन क्रिकेट टीमचा (Team India) मिस्टर 360 डिग्री म्हणजेच सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टी-20 वर्ल्डकपपासून (T20 world cup) उत्तम फॉर्ममध्ये दिसून येतोय. न्यूझीलंडविरूद्धच्या टी-0 सिरीजमध्येही सूर्यकुमारने दाणादाण उडवून दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये SKY हे नावं जगभरात चांगलंच गाजलं आहे. त्याच्या चाहत्यांसोबत दिग्गज व्यक्तींना देखील त्याची फलंदाजी प्रचंड आवडते. मात्र नुकत्याच एका व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादवने रोहित शर्माकडून (Rohit Sharma) काहीतरी चोरणार असल्याची गोष्ट बोलून दाखवलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका व्हिडीओमध्ये खुलासा करताना सुर्यकुमार यादव म्हणाला, मला रोहित शर्माचा एका शॉट चोरी करायवा आवडेल. याचाच अर्थ सूर्याला रोहितचा एक शॉट शिकायचा आहे.


एका यूट्यूब चॅनेलशी बोलताना सूर्यकुमार यादवला प्रश्न विचारण्यात आला की, संधी मिळाली तर त्याला कोणत्या खेळाडूचा शॉट चोरण्यास आवडेल. क्षणाचाही अवधी न घालवता सूर्यकुमारने लगेच उत्तर दिलं की, भारताचा कॅप्टन रोहित शर्माचं नाव घेऊन त्याच्या आवडीचा पुल शॉट चोरणार असल्याचं सांगितलं. 


वनडे मधून सूर्यकुमार बाहेर


न्यूझीलंडनंतर टीम इंडियाला बांगलादेशाचा दौरा करायचा आहे. यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज आणि 2 सामन्यांची टेस्ट सिरीज भारताला खेळायची आहे. मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवला या सिरीजच्या बाहेर ठेवण्यात आलंय. जाणून घेऊया सूर्याला या सिरीजमध्ये का निवडलं नाही.


सूर्याला का नाही मिळाली संधी?


न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे सिरीजनंतर काही खेळाडू बांगलादेशासाठी रवाना होणार आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत अनुभवी खेळाडूंचं कमबॅक होणार आहे. मात्र या सिरीजमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला बाहेर ठेवण्यात आलंय.