मल्ल परवीन राणाचा आरोप, सुशीलकुमार मला मारण्याच्या प्रयत्नात
अलिकडेच सुशीलकुमार समर्थक आणि परवीन राणाचे समर्थक आपापसात भिडले होते.
नवी दिल्ली : अलिकडेच सुशीलकुमार समर्थक आणि परवीन राणाचे समर्थक आपापसात भिडले होते.
समर्थकांकरवी हल्ला
राष्ट्रीय पातळीवरील मल्ल परवीन राणाने सुशीलकुमार मला जीवे मारू इच्छित होता, असा आरोप केला आहे. आपल्या समर्थकांना माझ्याविरुद्द चिथवून सुशीलकुमारने त्यांना मला मारायला सांगितले होते. माझ्या भावाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली, असं परवीन राणाचं म्हणणं आहे.
राष्ट्रीय स्पर्धेदरम्यानची इर्षा
दोन ऑलिम्पिक मेडल जिंकणारा सुशीलकुमार हा कुस्तीतला नामवंत खेळाडू. परवीन राणा हाही एक गुणी मल्ल. या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान सुशीलकुमार आणि परवीन राणाची कुस्ती झाली. त्यानंतर दोघांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात परवीन राणाचा भाऊ जखमी झाला.
सुशीलकुमारने दिली धमकी
राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान सुशीलकुमारने आपल्याला माघार घ्यायला सांगितली होती. पण आपण यास नकार दिला. त्यानंतर मला धमकीसुद्ध देण्यात आली. पण मी त्याच्या दबावात आलो नाही. त्याचाच बदला घेण्याचा प्रयत्न झाला असा आरोप परवीन राणाने केलाय.