आंध्र प्रदेश | सय्यद मुश्ताक अली स्पर्धा (Syed Mushtaq Ali Trophy 2021 ) 2021-22 मध्ये आज (8 नोव्हेंबर) विदर्भ (Vidarbha) विरुद्ध मणिपूर (Manipur) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात विदर्भाने मणिपूरवर 167 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. विदर्भाने मणिपूरला विजयासाठी 223 धावांचे आव्हान दिले होते. मात्र विदर्भाच्या गोलंदाजांनी मणिपूरला 55 धावांवर ऑल आऊट करत विजय साजरा केला. विदर्भाकडून अक्षय कर्णेवारने (Akshay Karnewar) अफलातून बॉलिंग करत 2 विकेट्स घेतल्या. अक्षयने टी 20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला. (Syed Mushtaq Ali Trophy 2021 Manipur vs Vidarbha Spinner akshay karnewar take 2 wickets in 4 overs spell withouat any runs) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की काय केलंय?


अक्षयने त्याच्या स्पेलमधील 4 ओव्हरमध्ये एकही धाव न देता 2 विकेट्स पटकावल्या. यासह अक्षय टी 20 क्रिकेटच्या इतिहासात 4 ओव्हरमध्ये एकही धाव न देणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. थोडक्यात काय तर अक्षयने चारही ओव्हर मेडन टाकल्या.


असा रंगला सामना 


विदर्भाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. विदर्भाने 4 विकेट्स गमावून 222 धावा केल्या. विदर्भाकडून जितेश शर्माने सर्वाधिक नाबाद 71 धावा केल्या. त्याने 31 चेंडूच्या खेळीत 5 चौकार आणि 5 सिक्स लगावले. विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या मणिपूरला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आले नाही. 


विदर्भाच्या गोलंदाजांसमोर मणिपूरच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. मणिपूर 16.3 ओव्हरमध्ये 55 धावांवर ऑलआऊट झाली. आश्चर्याची बाब म्हणजे मणिपूरच्या 9 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. यासह विदर्भाने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला.