मुंबई : अजिंक्य रहाणेला मुंबई नॉर्थ आणि सूर्यकुमारला मुंबई नॉर्थ ईस्ट संघाकडून सर्वाधिक सात लाखांची बोली लावण्यात आली. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित ट्वेन्टी-20 मुंबई लीगच्या आयकॉन खेळाडूंसाठी झालेल्या लिलावात अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादवला सगळ्यात महागडे खेळाडू ठरले. 


काही खेळाडूंना चांगली बोली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस अय्यरला मुंबई नॉर्थ सेंट्रल संघाने पाच लाखांची बोली लावली. याशिवाय रोहित शर्माला सहा लाखांची बोली लावत मुंबई नॉर्थ वेस्ट संघाने विकत घेतलं. 


आदित्य तरे अनसोल्ड


मुंबई रणजी संघाचा कर्णधार आदित्य तरे मात्र या आयकॉन खेळाडूंच्या लिलावात अनसोल्ड ठरला.


अभिषेक नायर आणि सिद्धेश लाडचा त्यांच्या मूळ किंमतीत म्हणजेच चार लाखात मुंबई साऊथ आणि मुंबई साऊथ वेस्ट संघाचे आयकॉन खेळाडू या नात्याने समावेश करण्यात आला आहे. 


मुंबईतील सहा संघ सहभागी होणार


या स्पर्धेत मुंबईतील सहा संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईतील स्थानिक खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ मिळणार आहे. 11 ते 21 मार्चदरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियम ही टी-20 मुंबई लीग स्पर्धा रंगणार आहे.