मुंबई : महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाच्या मेन्टॉरपदी (Team India Mentor) निवड करण्याचा निर्णय हा काही एका क्षणात घेतलेला नाही. आम्ही याबाबत गेल्या अनेक काळापासून विचार करत होतो, असं बीसीसीआय अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला. तो इंडिया टुडेच्या एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस त्याने याबाबत प्रतिक्रिया दिली. धोनीची टी 20 वर्ल्ड कपसाठी मेन्टॉरपदी निवड करण्यात आली आहे. (t 20 world cup 2021 bcci president sourav ganguly reaction to ms dhoni mentor)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गांगुली काय म्हणाला?


धोनीला संघात कसं सामावून घ्यायचं याबाबत मी आणि जय शाह चर्चा करत होतो. धोनीने त्याच्या नेतृत्वात 2 वर्ल्ड कप जिंकले आहेत. तसेच धोनी पूर्णपणे क्रिकेट सोडलेलं नाही. टीम इंडिया आणि धोनीचं मेन्टॉरपद हे समीकरण योग्य असेल, असं गांगुली म्हणाला.


"धोनी परिपक्व" 


मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्याशी धोनीला इगो प्रॉब्लेम तर होणार नाही ना, असा प्रश्न गांगुलीला विचारण्यात आलं. यावर गांगुली म्हणाला की, "शास्त्री कोच आहेत आणि विराट कॅप्टन आहे. महेंद्रसिंग धोनी त्यांना मदत करेल. धोनी एक परिपक्व माणूस आहे आणि त्याला केव्हा आणि काय बोलावे हे माहित आहे. मला खात्री आहे की प्रत्येक गोष्टीवर चर्चा झाली आहे.", असंही गांगुलीने नमूद केलं.


टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ही पाकिस्तान विरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्याने होणार आहे. हा सामना 24 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धचे सामने जिंकून सज्ज असल्याचं दाखवून दिलंय. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. यामुळे या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.