मुंबई : पकिस्तानने (Pakistan) टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या (T 20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये (Semi Final) न्यूझीलंडवर (New Zealand) विजय मिळवत फायनलमध्ये रुबाबात एन्ट्री घेतली आहे. त्यानंतर आता 10 नोव्हेंबरला टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात दुसरा सेमी फायनल सामना होणार आहे. या दुसऱ्या सेमी फायनलमधील विजेता संघ आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपसाठी काँटे की टक्कर पहायला मिळणार आहे. वर्ल्ड कपच्या फायनल मॅचचं आयोजन 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. (t 20 world cup 2022 know how many prizes will give to winner and runner-up teams see the full list)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट विश्वाला 13 नोव्हेंबरला वर्ल्ड कप विजेता संघ मिळणार आहे. वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमवर पैशांचा पाऊस पडणार आहे. फक्त विजेत्या संघालाच नाही, तर उपविजेत्यांनाही मोठी रक्कम बक्षिस (T20 World Cup 2022 Prize Money) म्हणून देण्यात येणार आहे.  


वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला 16 लाख यूएएस डॉलर म्हणजेच 13 कोटी 11 लाख 72 हजार रुपयांचं रोख बक्षिस मिळणार आहे. तर उपविजेत्यांना  8 लाख यूएस डॉलर म्हणजेच  6 कोटी 55 लाख 86 हजार 40 रुपये देण्यात येणार आहेत. सेमी फायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी 4 लाख यूएएस डॉलर म्हणजेच 3 कोटी 29 लाख 48 हजार 820 रुपये देण्यात येणार आहेत.  


गुरुवारी भारत-इंग्लंड सेमीफायनल


दरम्यान गुरुवारी 10 नोव्हेंबरला टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमी फायनल होणार आहे. या सामन्यात विजय होणार संघ पाकिस्तान विरुद्ध फायनलमध्ये भिडणार आहे.