T 20 WC : PAK विरुद्धच्या सामन्यासाठी Playing-11 ठरली, रोहितची घोषणा
टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला खेळणार आहे.
मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 ला (T 20 World Cup 2022) 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया (Team India) वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना 23 ऑक्टोबरला खेळणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची उत्सूकतेने वाट पाहत आहेत. कारण टीम इंडियाचा पहिलाच सामना हा हायव्होल्टेज सामना आहे. रोहितसेना पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध (IND vs PAK) भिडणार आहे. वर्ल्ड कपच्या पूर्वसंध्येला कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत अनेक उत्तरं दिली. तसेच पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याबाबतही रोहितने संकेत दिले आहेत. (t 20 world cup 2022 team india captain rohit sharma give hint about pakistan match playing 11)
रोहित काय म्हणाला?
"पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन ठरलीय. जे खेळाडू खेळणार आहेत, त्यांना मी सांगितलंय", असं रोहित म्हणाला.
"जितके खेळाडू आहेत, त्यांच्याकडून चांगली कामगिरी करुन घेणं इतकंच आपल्या हातात असतं. याशिवाय आपण काहीच करु शकत नाहीत. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआघी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन सज्ज आहे. जे खेळाडू खेळणार आहेत, त्यांना सज्ज राहण्यासाठी सांगितलं गेलंय. खेळाडूंना सज्ज राहण्यास सांगणं हे योग्य असतं", असंही रोहितने स्पष्ट केलं.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी संभावित टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कॅप्टन) , केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शमी.