मुंबई : ICC Men's T20 World Cup 2021 ची अखेर सुरुवात झाली आहे. 5 वर्षांच्या विरामानानंतर 16 संघ आता हा विश्वचषक जिंकण्यासाठी या लढतीत उतरले आहेत. या स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. 24 ऑक्टोबरला ही बहुप्रतिक्षित लढत होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार स्पोर्ट्सकडे टी20 विश्वचषकासहित आयसीसीच्या सर्व कार्यक्रमांचं टीव्हीवर आणि डिजिटल प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित करण्याचा विशेष अधिकार आहे. हे सामना मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहण्यासाठी तुमच्याकडे याचं सब्स्क्रिप्शन असणं गरजेचं असेल. शिवाय काहींना हे सामने मोफतही पाहता येतील. 


निवडक जिओ, एअरटेल आणि वी रिचार्ज प्लॅन घेणाऱ्यांपैकी तुम्हीही असाल, तर तुम्हाला टी20 वर्ल्डकप मोफत पाहण्याची संधी मिळू शकते. हा प्लॅन डिस्ने प्लस हॉटस्टारच्या मोबाईल सब्स्क्रिप्शनसह अमर्याद वॉईस कॉल, मोफत एसएमएस आणि डेटा अशा अनेक सवलती मिळणार आहेत.


ICC Men’s T20 World Cup 2021 पाहण्यासाठीचे Jio Cricket Plans


499 रुपयांचा  Jio रिचार्ज प्लान : यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्स्क्रिप्शन, 3 जीबी डेटा + 6 जीबी अतिरिक्त डेटा, मोफत वॉईस कॉल, दर दिवशी 100 एसएमएस आणि जिओ अॅप्ससाठीचा अॅक्सेस यांचा समावेश आहे. याची वैधता 28 दिवस इतकी आहे. 


666 रुपयांचा Jio रिचार्ज प्लान: यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्स्क्रिप्शन, 2 जीबी डेटा, मोफत वॉईस कॉल, दर दिवशी 100 एसएमएस आणि जिओ अॅप्ससाठीचा अॅक्सेस यांचा समावेश आहे. याची वैधता 56 दिवस इतकी आहे. 


888 रुपयांचा Jio रिचार्ज प्लान: यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्स्क्रिप्शन, 2 जीबी डेटा + 6 जीबी अतिरिक्त डेटा, मोफत वॉईस कॉल, दर दिवशी 100 एसएमएस आणि जिओ अॅप्ससाठीचा अॅक्सेस यांचा समावेश आहे. या प्लानची वैधता 84 दिवस इतकी असेल. 


2,599 रुपयांचा Jio रिचार्ज प्लान: यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्स्क्रिप्शन, 2 जीबी डेटा + 10 जीबी अतिरिक्त डेटा, मोफत वॉईस कॉल, दर दिवशी 100 एसएमएस आणि जिओ अॅप्ससाठीचा अॅक्सेस यांचा समावेश आहे. या रिचार्ज प्लानची वैधता 365 दिवस इतकी असेल. 


549 रुपयांचा Jio रिचार्ज प्लान: यामध्ये डिस्ने प्लस हॉटस्टारचं सब्स्क्रिप्शन, 1.5 जीबी डेटा जिओ अॅप्ससाठीचा अॅक्सेस यांचा समावेश आहे.  या रिचार्ज प्लॅनची वैधता 56 दिवस इतकी असेल.