Lionel Messi in T-20 World Cup : सध्या जगभर क्रिकेट वर्ल्ड कपचे वारे वाहत आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याच्या जगभर चर्चा जगभर असताना आता एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. फुटबॉल विश्वातला दिग्गज खेळाडू लिओनल मेस्सीचा फोटो व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांचं म्हणणं की मेस्सी क्रिकेटच्या मैदानात उतरला असून अम्पायरची भूमिका बजावत आहे. हे शक्य आहे का?, नाही तर मग नेमकं काय सत्य आहे? जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामना रंगला होता. सामन्यावेळी जे अम्पायर होते त्यांचा चेहरा मेस्सीसारखा दिसत होता. त्यामुळे अनेकांना वाटलं की तो मेस्सीच आहे मात्र जेव्हा नेटकऱ्यांच्याही लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी अम्पायरिंगसाठी मेस्सी तर आला नाही ना?, असं विचारत अम्पायरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. खरं सत्य असं आहे की मेस्सी काही क्रिकेटच्या मैदानात उतरला नव्हता. तो तिकडे फुटबॉलचं मैदान गाजवत आहे.




सामन्यात पावसाचा खोळंबा-
झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यामध्ये पावसाने खोळंबा घातला मात्र याचा फटका आफ्रिकेच्या संघाला बसला. सामनाधिकाऱ्यांनी 9 ओव्हर्सचा सामना खेळवण्यात आला. 9 ओव्हरर्सच्या या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत 80 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण डी कॉकच्या (quinton de cock) झंझावातासमोर सगळंच उद्ध्वस्त ठरलं. डी कॉकने पहिल्या ओव्हरमध्ये 3 फोर मारले नंतर एक गगनचुंबी सिक्स ठोकला आणि पाचव्या बॉलवर पुन्हा फोर मारला. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली.


डिकॉकची आक्रमक खेळी आफ्रिकेला विजय मिळवून देऊ शकली नाही. कारण झिम्बाब्वेचं पराभव होणं जणू नियतीलाच मान्य नव्हतं. पुन्हा पाऊस आला आणि खेळ थांबवावा लागला.