T20 WC 2022: ग्रुप स्टेजमधून या दोन संघांची Super 12 फेरीत एन्ट्री, उलटफेर करणारा संघ स्पर्धेबाहेर
टी 20 वर्ल्डकप ग्रुप 2 सुपर 12 फेरीतील दोन संघांसाठी स्कॉटलँड, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिया या संघात चुरस निर्माण झाली आहे. आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड विरुद्ध झिम्बाब्वे शुक्रवारी होणार आहेत. टॉप दोन संघांची सुपर 12 फेरीत वर्णी लागणार आहे.
T20 World Cup 2022 Super 12: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेतील ग्रुप स्टेज ए मधून श्रीलंका आणि नेदरलँड या दोन संघांनी सुपर 12 फेरीत धडक मारली आहे. पहिल्या सामन्यात बलाढ्य श्रीलंकेला हरवणारा नामिबियाचा संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ग्रुप स्टेज ए गटात श्रीलंकेचा संघ 3 सामन्यात 2 विजयासह 4 गुण आणि +0.667 धावगतीसह अव्वल स्थानी आहे. तर नेदरलँडचा संघ 3 सामन्यात 2 विजयासह 4 गुण आणि -0.162 धावगतीसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे सुपर 12 फेरीत दोन संघ कोणत्या गटात असतील हे निश्चित झालं आहे. ग्रुप स्टेज ए मध्ये अव्वल स्थानी असलेला श्रीलंका संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड आणि अफगाणिस्तान या गटात असणार आहे. तर नेदरलँडचा संघ ग्रुप 2 मधील भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश गटात असणार आहे.
ग्रुप 1 | ग्रुप 2 |
इंग्लंड | भारत |
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान |
न्यूझीलंड | बांगलादेश |
अफगाणिस्तान | दक्षिण आफ्रिका |
श्रीलंका | नेदरलँड |
दुसरीकडे, उर्वरित सुपर 12 फेरीतील दोन संघांसाठी स्कॉटलँड, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिया या संघात चुरस निर्माण झाली आहे. आयर्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड विरुद्ध झिम्बाब्वे शुक्रवारी होणार आहेत. टॉप दोन संघांची सुपर 12 फेरीत वर्णी लागणार आहे.
श्रीलंका विरुद्ध नेदरलँड
श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेनं 20 षटकात 6 गडी गमवून 162 धावा केल्या आणि विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँडचं फलंदाज झटपट बाद झाले. यामुळे फलंदाजांवर दबाव वाढला. नेदरलँडने 20 षटकात 9 गडी गमवून 146 धावा केल्या. श्रीलंकेनं नेदरलँडचा 16 धावांनी पराभव केला.
नामिबिया विरुद्ध यूएई
वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या फेरीत नामिबियानं श्रीलंकेला पराभूत करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र उर्वरित दोन सामन्यात साजेशी कामगिरी करता आली नाही. यूएईविरुद्धच्या करो या मरोच्या सामन्यात नामिबिया पराभूत झाली आणि सुपर फेरीच्या आशा संपुष्टात आल्या. यूएईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूएईने 20 षटकात 3 गडी गमवून 148 धावा केल्या आणि विजयासाठी 149 धावांचं आव्हान दिलं. नामिबियाला 20 षटकात 8 गडी गमवून 141 धावा करता आल्या. यूएईने 7 धावांनी नामिबियावर विजय मिळवला.