पर्थ : यंदाच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची सुरुवात अगदी दणक्यात झाली. पहिल्याच पाकिस्तान विरूद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही विजयी घौडदौड सुरुच ठेवली. टीमइ इंडिया ग्रुप 2 मध्ये असून 2 सामने जिंकल्यावर पॉईंट्स टेबलवर अव्वल क्रमांकावर आहे. तर आता टीम इंडियाचं पुढचं मिशन आहे ते दक्षिण आफ्रिका.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेमीफायनलचं तिकीट पक्क करण्यासाठी टीम इंडियाने त्यांच्या पुढील मिशनची तयारी सुरू केलीये. पुढचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेसोबत होणार असून हा सामना चांगलाच कठीण होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.


एकंदरीत पाहिलं तर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही टीम सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. टीम इंडियाची टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केलीये. इतकंच नाही तर वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करताना दिसतायत. 


याव्यतिरीक्त दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेची टॉप ऑर्डरही चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येतेय. समोरच्या टीमचे क्विंटन डी कॉक आणि रिले रोसो चांगली फलंदाजी करत जलद रन्स करण्यात माहीर आहेत. दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा एकूण 104 रन्सने पराभव केला होता. 


हेड टू हेड रेकॉर्ड


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झालेत. यामध्ये टीम इंडियाने 13 सामने जिंकलेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने 9 सामने जिंकलेत. यामध्ये एक सामना अनिर्णित राहिला आहे. एकंदरीत पहायला गेलं तर यामध्ये टीम इंडियाचं पारडं जड आहे.


कुठे पहायची मॅच?


30 ऑक्टोबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे. रविवारी दुपारी 4.30 वाजता पर्थ स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या काही चॅनेल्सवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे डिस्ने+हॉटस्टार अॅपवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येऊ शकणार आहे.