Team India Meet PM Modi : भारतीय क्रिकेट संघाने 29 जूनला दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टी20 वर्ल्ड कपवर (T20 World Cup) नाव कोरलं. 17 वर्षांनंतर दुसऱ्यांदा टीम इंडियाने (Team India) दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकण्याची किमया साधली. जगज्जेत्या टीम इंडियाचं मायदेशात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुंबईत ओपन बसमधून टीम इंडियाच्या खेळाडूंची विजयी मिरवणूक (Victory Parade) काढण्यात आली. त्यानंतर वानखेडे स्टेडिअमवर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्याआधी दिल्लीत टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान यांच्या निवासस्थानी पीएम मोदी यांनी खेळाडूंना ऐतिहासिक विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी खेळाडूंशी गप्पा मारल्या. यावेळी पीएम मोदी यांच्यासमोर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भावूक झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये काय घडलं?
आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 स्पर्धेनंतर आयपीएल 2024 साठी मिनी ऑक्शन झालं. यावेळी मुंबई इंडियन्सने घेतलेल्या काही निर्णयांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. फ्रँचाईजीने रोहित शर्माची उचलबांगडी करत मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची नियुक्ती केली. पण ही निवड मुंबईकरांना रुचली नाही. सोशल मीडियाबरोबरच प्रत्यक्ष मैदानाताही हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यात आलं. पण मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी हार्दिक पांड्याला चांगली साथ दिली. हार्दिक पांड्या मैदानावर उतरताच प्रेक्षकांकडून त्याची खिल्ली उडवली जायची. छपरी नावाने त्याला चिडवलं जात होतं. पण यावर हार्दिक पांड्याने कधीच प्रतिक्रिया दिली नाही. अखेर पंतप्रधान मोदींसमोर हार्दिकने आपलं मौन सोडलं.


हार्दिक झाला भावूक
पंतप्रधान मोदी यांनी टीम इंडियातल्या सर्व खेळाडूंना प्रश्न विचारले. ज्यावेळी हार्दिक पांड्याला प्रश्न विचारला त्यावेळी हार्दिक भावूक झाला. गेले 6 महिने माझ्यासाठी खूपच मनोरंजक होते, खूप चढ-उतार पाहायला मिळाले. ज्या चाहत्यांनी प्रेम दिलं, त्याच चाहत्यांकडून वाईट-साईट ऐकावं लागलं. पण मी ठरवलं होतं, की याचं उत्तर मी खेळातूनच देईन, मला माझ्यावर आणि माझ्या मेहनतीवर विश्वास होता. मी मेहनत केली आणि वर्ल्ड कपमध्ये शेवटचं षटक टाकण्याची संधी मिळाली' असं हार्दिक पांड्याने सांगितलं.


हार्दिक पांड्याचं उत्तर एकून पीएम मोदी यांनी त्याचं कौतुक केलं. त्यानंतर हार्दिकला त्यांनी एक प्रश्न विचारला, तुझं शेवटचं षटक तर ऐतिहासिक ठरलं, पण सूर्यकुमारला तू काय विचारलस? यावर उत्तर देताना हार्दिक म्हणाला सूर्याने कॅच पकडल्यानंतर आम्ही जल्लोष केला, पण सूर्याकडून याबाबत कन्फर्म करुन घेतलं, असं हार्दिक म्हणाला.