T20 World Cup आणि IPLचा कसा सुटणार पेच? ICCकडून BCCIला मोठा दिलासा
टी 20 वर्ल्डकप 2021च्या नियोजनासंदर्भात आता BCCIला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई: टीम इंडिया आता इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी न्यूझीलंड विरुद्ध सामना खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी सीरिज आहे. 4 मे रोजी कोरोनामुळे आयपीएलचे स्थगित करण्यात आलेले 31 उर्वरित सामने आता UAEमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. या सामन्यांसाठी इंग्लंड सीरिजमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असं इंग्लंड क्रिकेट बोर्डनं जाहीर केलं होतं.
टी 20 वर्ल्डकप 2021च्या नियोजनासंदर्भात आता BCCIला मोठा दिलासा मिळाला आहे. ICCने हा पेच सोडवण्यासाठी BCCIला 28 जूनपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. 28 जूनपर्यंत BCCIला आयपीएल आणि टी 20 वर्ल्डकपचा पेच सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
BCCIने मागिलता होता वेळ
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी टी -20 वर्ल्ड कप होणार आहे. आयसीसी बोर्डाने एकमताने दिलेल्या या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी BCCIने एक महिन्याचा कालावधी मागितला होता. ICCने BCCIला 28 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. यामध्ये टी 20 वर्ल्डकपचं नियोजन आणि IPL2021 चा दोन्हीचा पेच सोडवण्याची जबाबदारी असणारी आहे.
आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने युएईच्या दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे खेळले जातील. हे सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये 25 दिवसांच्या कालावधीत होतील. त्यानंतर भारतातच टी -20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
आयसीसीचे मत होते की, ही स्पर्धा भारताऐवजी युएईमध्ये खेळली जावी, परंतु बीसीसीआयने आयसीसीच्या सर्व योजनांना सुरुंग लावला. आयपीएलचे 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन मैदानावर खेळले जातील. जर तीन मैदानावर 31 सामने खेळले गेले तर युएईमध्ये टी-20 विश्वचषक 2021 चे आयोजन करणे शक्य होणार नाही, कारण या मेगा स्पर्धेत 45 सामने खेळले जातील.
आयपीएलच्या 31 सामने जूनमध्ये आणि पीएसएलचे 20 सामने होणार आहेत. अशा परिस्थितीत, युएईच्या तीन मैदानांवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 45 सामन्यांसाठी खेळपट्टी आणि मैदान तयार करणे सोपे काम ठरणार नाही. त्यामुळे टी-20 विश्वचषक भारतातच होऊ शकतो असं BCCIचं म्हणणं आहे.