T-20 World Cup 2022 : आस्ट्रेलिया आणि श्रीलंकेमधील सामन्यामध्ये यजमानांनी मोठा विजय मिळवला आहे. श्रीलंकेचा 7 विकेट्स आणि 21 चेंडू राखून पराभव करत वर्ल्ड कपमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला आहे. ऑल राऊंडर मार्कस स्टॉयनिसने केलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर कांगारूंनी हा विजय साकारला आहे. (T20 World Cup 2022 Australia beat srilanka Marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला होता, श्रीलंकेकडून निसांका 40, धनंजय डिसिल्वा 26, असालंकाच्या 38 धावांच्या जोरावर श्रीलंकेने 158 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रिलियाच्या संघावर दबाव निर्माण केला होता. 


सलामीवीर डेव्हिड वॉर्नर 11, मिचेल मार्श 18 आणि आक्रमक ग्लेन मॅक्सवेल 23 धावांवरच बाद झाले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी निर्माण केलेला दबाव हा मार्कस स्टॉयनिसने कमी केला. उलट त्याने श्रीलंकेच्या स्पीनर्सवर आक्रमण करत चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. मार्कसने अवघ्या 18 चेंडूत 59 धावांच्या खेळी केली यामध्ये त्याने सहा सिक्स आणि चार चौकार मारले. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकत वर्ल्ड कपमधील आपला पहिला विजय नोंदवला. 


दरम्यान, यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिल्या सामन्यात न्युझीलंडकडून लाजिरवाणा पराभव झाला होता. पहिला सामना गमावल्यामुळे श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकणं ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचं होतं. आक्रमक खेळी करणाऱ्या मार्कस स्टॉयनिसला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.