T20 WC: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामना पावसात वाहून गेला, हताश जोस बटलर म्हणतो...
T20 World Cup, Rain in Melbourne: मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे एकाच दिवशी T20 विश्वचषकातील दोन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले.
T20 World Cup, Australia vs England: सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा (t20 world cup) थरार रंगला आहे. मात्र ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Aus vs Eng) यांच्यातील टी-20 विश्वचषक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे होणाऱ्या या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते पण पावसामुळे एकही चेंडू टाकल्याशिवाय सामना रद्द करावा लागला. विशेष म्हणजे पावसामुळे एकाच दिवशी दोन सामने होऊ शकले नाहीत. यापूर्वी मेलबर्नमध्येच (Melbourne) आयर्लंड आणि अफगाणिस्तान (AFG vs IRE) यांच्यातील सामना रद्द करावा लागला होता.
इंग्लंड संघाच्या अडचणी वाढ!
सुपर-12 फेरीच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडला आयर्लंडविरुद्ध (England v Ireland) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंड संघाच्या कर्णधारालाही हा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा होता पण हवामानामुळे तसे होऊ शकले नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. हा सामना रद्द झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने निराशा व्यक्त केली.
वाचा : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण, मात्र पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे
जोस बटलरने दिली प्रतिक्रिया
सामना रद्द झाल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने (Jos Butler) पत्रकार परिषदे घेऊन निराशा व्यक्त केली. 'या सामन्याशी संबंधित सर्व लोकांसाठी ही निराशाजनक बाब आहे. मी हवामानशास्त्रज्ञ नाही, पण आम्हाला हा सामना खेळायचा होता. सामन्याचा निकाल काहीही असो, एक क्रिकेट संघ म्हणून तुम्हाला प्रत्येक क्षण अनुभवायचा असतो. अशी संधी पुन्हा कधी येईल हे कोणालाच माहीत नाही, अशी प्रतिक्रिया जोस बटलरने दिली आहे. इंग्लंडचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध 1 नोव्हेंबरला होणार आहे.