Rohit Sharma Statement : भारतानं मेबर्नच्या मैदानात झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर रोहितने कर्णधाराच्या रूपात इतिहास रचला आहे. कर्णधाराच्या रूपात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी 2022 मधील हा 21 वा (टी-20 क्रिकेट) विजय होता. रोहित आता एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा कर्णधार बनला आहे. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचा विक्रम मोडीत काढला आहे. बाबरने एका वर्षात 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळवून दिला आहे.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता टिम इंडिया येत्या गुरूवारी म्हणजेच 10 नोव्हेंबर ला इंग्लंडविरुद्धचा सामना खेळणार आहे. या सामन्यादरम्यान टिम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक प्रतिक्रिया दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडिया त्याच्याशी कसा सामना करेल हे कॅप्टन रोहित शर्माने सांगितलं.


इंग्लंड विरुद्ध मॅचआधी रोहित म्हणाला….


एडिलेडमध्ये इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल मॅच (Semi-final match against England) होणार आहे. त्याबद्दल रोहित म्हणाला की, “तिथल्या कंडीशन्सशी लवकरात लवकर जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. इंग्लंड एक चांगली टीम आहे. एक चांगला सामना होईल. आम्ही सेमीफायनलमध्ये चांगले खेळलो, तर अजून एका मोठ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल. लाइन अँड लेंग्थ समजून घेण महत्त्वाचं आहे. चाहत्यांनी सर्वच सामन्यांमध्ये उदंड प्रतिसाद आणि पाठिंबा दिला. सेमीफायनलमध्ये सुद्धा आम्हाला अशीच अपेक्षा आहे”


कर्णधार रोहित शर्माने मास्टर प्लान सांगितला


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, 'इंग्लंड संघ सध्या खूप चांगले क्रिकेट खेळत आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यात अत्यंत काट्याची लढत होणार आहे. तो म्हणाला, 'आमचा संघ कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करून इथपर्यंत पोहोचला आहे हे आपण विसरू नये.'


वाचा : भारताबाबत शाहीद आफ्रिदीने केले 'हे' गंभीर आरोप; म्हणाला... 


टीम इंडिया उपांत्य फेरीच्या सामन्यात कोणतीही कसर सोडणार नाही


रोहित शर्मा म्हणाला, 'आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये जसा खेळ दाखवला तोच खेळ आम्हाला उपांत्य फेरीच्या सामन्यात दाखवण्याची गरज आहे. टीम इंडियाच्या (Team India) प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. इंग्लंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना अत्यंत दबावाचा असेल. आम्हाला इंग्लंडविरुद्ध चांगला खेळ करण्याची गरज आहे.  


दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्धचा हा सामना कर्णधाराच्या रूपात रोहितचा 50 वा टी-20 सामना होता. यापूर्वी विराट कोहली देखील भारतासाठी 50 टी-20 सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार म्हणून खेळला आहे. भारतासाठी सर्वाधिक टी-20 सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याचा विक्रम एमएस धोनी, याच्या नावावर आहे. धोनीने भारतासाठी 72 टी-20 सामन्यांमध्ये कर्णधाराची भूमिका पार पाडली आहे.