Ind vs SA सामन्यात हा ठरला टर्निंग पॉईंट, स्टेडियमवर पसरली शांतता
T20 World Cup 2022 : भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाच्या 2 संधी हुकल्या जिथे टीम इंडियाला कमबॅक करता आले असते.
Ind vs SA : भारतीय संघाला आज T20 world cup 2022 च्या तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारताची (Indian Team) सुरुवात खराब झाली. ज्यामुळे भारतीय संघाला मोठं आव्हान उभं करता आलं नाही. दक्षिण आफ्रिका संघाने 5 विकेट गमवत विजय मिळवला. डेविड मिलरच्या (David Miller) चांगल्या खेळीमुळे भारताचा पराभव झाला. विकेट पडल्या असत्या तर भारतीय संघाला सामना जिंकता आला असता.
पर्थच्या स्टेडियममध्ये विराट कोहलीकडून (Virat Kohli) एक चूक झाली. ज्यामुळे मैदानावर शांतता पसरली. विराट कोहलीने कॅच सूटला आणि तिथून सामना ही हातातून सूटत गेला. आर अश्विनच्या (R Ashwin) बॉलिंगवर 12 व्या ओव्हरमध्ये पाचवा चेंडू एडन मार्करामने डीप मिड-विकेटच्या दिशेने खेळला, जिथे विराट कोहली उभा होता. विराट कोहलीच्या हातात एक सोपा झेल आला होता, पण त्याच्याकडून हा कॅच सूटला. त्याला कॅच पकडण्याची दुसरी संधीही मिळाली, पण चेंडू पुन्हा पडला.
विराटकडून कॅच सुटल्यानंतर सुमारे 60 हजार प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडियम स्तब्ध झाले आणि सर्वत्र शांतता पसरली. विराट सारख्या खेळाडूकडून कोणाला ही अशी अपेक्षा नसते. पण शेवटी खेळ आहे. त्यात काहीही होऊ शकतं. पुढच्याच षटकात रोहित शर्माकडून (Rohit Sharma) रनआऊट करण्याची संधी ही हुकली. भारताला या दोन विकेट मिळाल्या असत्या तर नक्कीच संघ चांगल्या स्थितीत गेला असता. पण असं झालं नाही.