T20 World Cup 2022: टी-20 मध्ये टिम साऊदीचा सर्वाधिक विकेट्सचा विश्वविक्रम
न्यूझीलंडचा अनुभवी (New zealand bowler) वेगवान गोलंदाज टिम साऊथीच्या (tim saudi) नावावर नवा रेकॉर्ड नोंद झाला आहे. 33 वर्षीय सौदीने टी20 विश्वचषक 2012 च्या गट 1 च्या सामन्यात असाच पराक्रम केला होता. (most successful wicket taker in t20)
T20 World Cup 2022 : न्यूझीलंडचा अनुभवी (New zealand bowler) वेगवान गोलंदाज टिम साऊथीच्या (tim saudi) नावावर नवा रेकॉर्ड नोंद झाला आहे. 33 वर्षीय सौदीने टी20 विश्वचषक 2012 च्या गट 1 च्या सामन्यात असाच पराक्रम केला होता. (most successful wicket taker in t20)
सिडनी क्रिकेट ग्राउंडवर श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंड (SL vs NZ) सामन्यात किवी संघाने प्रथम फलंदाजी करताना ग्लेन फिलीसच्या शतकासह सात विकेट्सवर 167 धावा केल्या होत्या. श्रीलंका 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला पण त्यांची सुरुवात फारच खराब झाली. टीम साऊदीने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये श्रीलंकेला पहिला धक्का दिला. या वेगवान गोलंदाजाने डावाच्या पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निसांका याला एलबीडब्ल्यू बाद केले. ही विकेट घेत सौदीने नवा विश्वविक्रम केला.
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम
जेव्हा त्याने गोलंदाजी सुरू केली तेव्हा टीम साऊदीच्या खात्यात 125 विकेट्स होत्या आणि तो बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनसह पहिल्या स्थानावर होता. निशांकाची विकेट गमावल्याने, तो शाकिबला मागे टाकून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलाय. आता सौदीच्या खात्यात 126 विकेट जमा झाल्या आहेत.
सर्वाधिक विकेट घेणारे टॉप 5 गोलंदाज
सौदीने आपल्या 102 व्या सामन्याच्या 100 व्या डावात हा पराक्रम केला. 106 सामन्यांच्या 104 डावात 125 बळी घेत शाकिब दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अफगाणिस्तानचा चॅम्पियन फिरकीपटू राशिद खान 72 सामन्यांमध्ये 119 विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर असलेला लसिथ मलिंगा 84 सामन्यांच्या 83 डावांत 107 बळी घेत चौथ्या स्थानावर आहे. ईश सोधी हा न्यूझीलंडचा टॉप 5 मध्ये दुसरा गोलंदाज आहे. या भारतीय वंशाच्या किवी फिरकीपटूने आतापर्यंत 83 सामन्यांच्या 80 डावांमध्ये 104 बळी घेतले आहेत.
1. टिम साउथी - 126 विकेट
2. शकिब अल हसन - 125 विकेट
3. राशिद खान - 119 विकेट
4. लसिथ मलिंगा - 107 विकेट
5. ईश सोधी - 104 विकेट
11. भुवनेश्वर कुमार - 88 विकेट
भुवनेश्वर कुमार सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज
आतापर्यंत या 5 गोलंदाजांनी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 100 हून अधिक विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar kumar) आहे, ज्याने आतापर्यंत 81 सामन्यांच्या 80 डावात 88 बळी घेतले आहेत. सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भुवी 11व्या स्थानावर आहे.