India, T20 World Cup semi final: टीम इंडियाने टी-20 विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4 विकेटने पराभव केला. त्याचवेळी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. यानंतर गट-2 संघांनी सेमीफायनल गाठण्याचं समीकरण खूपच रंजक बनलंय. त्यामुळे आता सेमीफायनलचं गणित आणखी कढीण झालं आहे. 


Group 2 ची सध्याची स्थिती...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना ओव्हर कापल्यानंतरही रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. तर बांग्लादेशने नेदरलँडचा आरामात पराभव केलाय. त्यामुळे आता रनरेटच्या प्रमाणानुसार बांग्लादेश अव्वल स्थानी विराजमान झालाय. तर भारत दुसऱ्या स्थानी आहे.


कसं असेल सेमिफायनलचं गणित??


भारतीय संघाने आपले उर्वरित सर्व सामने जिंकले तर 10 गुणांसह ते सेमीफायनलमध्ये सहज प्रवेश करेल. भारतीय संघाने उर्वरित सर्व सामने जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला तरीही टॉप-4 मध्ये दुसरं स्थान मिळवण्याची संधी असेल. एखाद्या संघाने पाकिस्तानचा पराभव केला आणि पाकिस्तानने आपले सर्व सामने जिंकले तर पहिल्या सामन्यात बलाढ्य पाकिस्तानला पराभूत केल्यामुळे भारताचा गटात वरचष्मा राहील.


आणखी वाचा - Dinesh Karthik : पोरानं मैदान मारलं अन् बाप टाचा वर करून घोळक्यात उभा होता!


दरम्यान, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि नेदरलँड हे तीन बलाढ्य संघ भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवू शकणार नाहीत, या आधारावर ही सर्व समीकरणं तयार केली जात आहेत. उलथापालथ झाल्यास, दिग्गज संघाला सेमिफायनलमध्ये पोहोचता येणार नाही. तर दुसरीकडे पावसाने गोंधळ घातल्यास भारताला देखील दणका बसू शकतो. त्यामुळे रनरेट चांगला ठेऊन रोहित आणि विराटला खेळावं लागणार आहे.