T20 World Cup Semifinal : टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप ए मध्ये सेमीफायनलच्या दोन टीम निश्चित झाल्या आहे. इंग्लंडने श्रीलंकेचा (England vs Srilanka) 4 विकेटने पराभव केला. सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) रंगलेल्या या सामन्यात श्रालंकेने इंग्लंडलसमोर विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात इंग्लंडने शानदार विजय मिळवत सेमफायनलमध्ये (Semifinal) आपली जागा पक्की केली. ग्रुप ए मधून न्यूझीलंडने (New Zealand) आधीच सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली आहे. त्यामुळे यजमान ऑस्ट्रेलियावर (Australia) साखळीतच बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-इंग्लंड सेमीफायनल?
ग्रुप ए मध्ये (Group A) न्यूझीलंड पहिल्या तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा सामना ग्रुप बी (Group B) मधल्या दुसऱ्या स्थानावरच्या टीमशी होईल तर इंग्लंडचा सामना ग्रुप बी मधल्या पहिल्या स्थानावरच्या टीमशी रंगेल. अशात ग्रुपी बी मध्ये भारत पहिल्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे. पण यासाठी भारताला आपल्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेला हरवावं लागणार आहे. हा सामना जिंकला तर सेमीफायनलमध्ये भारताचा सामना 10 नोव्हेंबरला इंग्लंडशी (India vs England) अॅडलेड ओव्हलमध्ये खेळला जाईल. 


दुसरीकडे ग्रुप एमध्ये टॉपवर असलेल्या न्यूझीलंडचा सामना ग्रुप बीमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेशी होईल. केन विल्यम्सनचा संघ 9 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना नेदरलँडशी रंगणार आहे.


सेमीफायनलच्या शर्यतीत पाकिस्तानही
ग्रुप एमध्ये सेमीफायनलसाठी चित्र स्पष्ट झालं असलं तरी ग्रुप बीमध्ये मोठी चुरस आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत बाबर आझमचा पाकिस्तान (Pakistan) संघही दावेदार आहे. टीम इंडिया (Team India) आपल्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेबरोबर (Zimbabwe) हरली आणि पाकिस्तानी टीम बांगलादेशविरुद्धचा (Bangladesh) सामना जिंकली तर रनरेटच्या आधारे पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा असेल. किंवा दक्षिण आफ्रिका (South Africa) नेदरलँडशी (Netherlands) हरली तर सेमीफायनलमध्ये जाणारी दुसरी टीम म्हणून पाकिस्तानला संधी मिळू शकते.


भारताला विजय महत्त्वाचा
सेमीफायनलसाठ भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्ध जिंकावच लागणार आहे. भारतीय संघाची सध्याची कामगिरी पाहता झिम्बाब्वेचं आव्हान भारतासाठी फारसं कठिण नसेल. भारत-झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) सामना पावसामुळे रद्द झाला तरी भारताच्या खात्यात एक गुण जमा होईल. त्यामुळे भारताचे सात गुण होतील आणि ग्रुप बीमध्ये भारतीय संघ टॉपवर असेल.


पण झिम्बाब्वेने भारताला हरवलं आणि दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आपले शेवटचे सामने जिंकले तर मात्र भारतासाठी मोठा धोका ठरू शकतं. दक्षिण आफ्रिकेचे सात तर भारत आणि पाकिस्ताचे प्रत्येकी 6 गुण होतील. अशा परिस्थितीत सरस रनरेट असणारा संघ सेमीफायनल गाठेल. पाकिस्तानचा संघ रनरेटच्या बाबतीत भारतीय संघापेक्षा पुढे आहे.