T20 World Cup 2022  :  टीम इंडियाने (Team India) 4 सामने जिंकत सेमीफायनलमध्य़े धडक दिली आहे. भारताचा सामना आता इंग्लंड सोबत होणार आहे. (Ind vs Eng) हा सेमीफायनल सामना 10 नोव्हेंबरला अॅडलेडमध्ये खेळला जाणार आहे. त्यातच 6 नोव्हेंबरला झिब्माव्बेविरूद्धच्या सामन्यानंतर टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चांगलाच झळकला आहे. केवळ भारतातीलच नाही तर इतर देशातील दिग्गज देखील त्याचं कौतुक करतायत. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसनने देखीस सुर्यकुमारचे कौतुक केल्याशिवाय राहवलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) T20 क्रिकेटमधला टॉप बॅट्समन (Top batsman) असून वर्ल्ड टी 20 (t20 world cup racking) रँकिंगमध्ये तो पहिल्या स्थानावर आहेच. पण सध्या ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार नावाच्या वादळात भल्या-भल्या टीम्सची वाताहात होत आहे. सूर्यकुमार यादवला रोखणं, हे आज प्रत्येक टीमसमोरच मोठ चॅलेंज आहे. वेगवान धावा आणि सहजतेने बॅटिंग हे सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) फलंदाजीच वैशिष्टय आहे.


याच दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसन (Shane Watson) म्हणाला की, सुर्याकुमार ज्या प्रकारची फलंदाजी करत आहे तशी फलंदाजी फार कमी लोक करू शकतात असे म्हटले आहे. तसेच सुर्याकुमारने आयपीएलमध्ये जे काही केले त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची पुनरावृत्ती करणे सोपे नाही. ऑस्ट्रेलियासारख्या देशात येणे आणि सतत धावा करणे हा प्रत्येकाचा व्यवसाय नाही. शेन वॉटसन म्हणाला की, गोलंदाजाला वाचून त्याच्याविरुद्ध असे शॉट्स खेळण्यात मजा येते.


वाचा : महाराष्ट्रात कुठे आणि किती वाजता दिसेल चंद्रग्रहण? हा असेल सुतक काळ 


या विश्वचषकात सूर्यकुमार यादवची टीम इंडियासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये 225 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 200 च्या आसपास होता. सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 3 अर्धशतक केले आहेत.


अलीकडेच, झिम्बाब्वेविरुद्धच्या 25 चेंडूत 61 धावांच्या खेळीदरम्यान, सूर्यकुमार यादवने खेळलेल्या डावात अनेक आश्चर्यकारक शॉट्स पाहायला मिळाले. ऑफ-की लेग साईडला षटकार मारताना किंवा फास्ट बॉलरचा स्कूप बॉलला मारताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.