T20 World Nasser Hussain On Team India: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात पोहोचली असून जोरदार सराव सुरु आहे. भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून चांगलं क्रिकेट खेळत आहे. मात्र आशिया कप 2022 स्पर्धेत टीम इंडियाचं प्रदर्शन निराशाजनक राहिलं. आता टी 20 वर्ल्डकपासाठी (T20 World Cup) टीम इंडिया सज्ज आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत (India Vs Pakistan) होणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन (Nasser Hussain) यांचं वक्तव्य चर्चेत आहे. नासिर हुसैन यांच्या मते, "भारतीय संघात चांगले खेळाडू आहेत. भारताने अनेक मालिका जिंकल्या आहेत. पण वर्ल्डकपसारख्या आयसीसी स्पर्धेत भारतीय संघ घाबरत घाबरत खेळतो. त्यामुळे भारतीय संघाचं मोठं नुकसान होतं. "


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाने निर्धास्तपणे सामना केला पाहीजे. खासकरून पॉवरप्लेमध्ये. टीम इंडियाच्या खेळाडूंकडे आक्रमकपणे खेळण्याची क्षमता आहे. सुर्यकुमार यादवही फॉर्मात आहे. टीम इंडियाने द्विपक्षीय मालिका खेळत आहे असं समजून सामना केला पाहीजे.", असा सल्लाही माजी क्रिकेटपटू नासिर हुसैन यांनी दिला.


T20 WC 2022: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अशी असेल भारताची Playing XI, या तीन दिग्गज खेळाडूंना वगळणार!


टी 20 वर्ल्डकप 2020 स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भारतीय संघांचं आव्हान ग्रुप स्टेजमध्ये संपुष्टात आलं होतं. भारतीय संघाने 1983 आणि 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2007 मध्ये टी 20 वर्ल्डकप जिंकला आहे.


T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया- रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल , विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.