T20 world cup 2022 : भारतीय संघ सेमीफायनलमध्ये (Semifinal) पोहोचण्याची शक्यता आहे. सुपर-12 सामन्यांमुळे उपांत्य फेरीचे चित्र काहीसे स्पष्ट होऊ लागले आहे. भारताने पहिले 2 सामने जिंकले असून तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. पण जर टीम इंडियाने (Team India) सेमीफायनल गाठली तर त्यांचा सामना हा कोणासोबत होणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा पुढचे दोन सामने बांगलादेश आणि झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहेत. हे सामने जिंकणे टीम इंडियासाठी सोपे आहे. पण खेळात काहीही होऊ शकतं. भारतीय संघाचा चौथा सामना बांगलादेश विरुद्ध 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर तिसरा सामना झिम्बाब्वे विरुद्ध 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारताने हे दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 8 गुण होणार आहेत. पण जर दक्षिण आफ्रिकेने शेवटचे दोन सामने जिंकले तर त्याचे 9 गुण होतील. म्हणजेच टीम इंडिया नंबर-2 वर राहू शकते. दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे दोन सामने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध आहेत.


उपांत्य फेरीत कोणाशी स्पर्धा?


गट-1 मधील अव्वल संघाचा सामना गट-2 च्या क्रमांक 2 संघाशी, तर गट-2 मधील अव्वल संघाचा सामना गट-1 मधील क्रमांक-2 संघाशी होईल. आतापर्यंतची स्थिती पाहता, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे गट-1 मधील एकमेव संघ आहेत, जे शेवटपर्यंत अव्वल-2 मध्ये राहतील असे दिसते. म्हणजेच हे दोनच संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.


आयर्लंडचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे 5 गुण झाले असून त्यांचा एक सामना बाकी आहे. तर न्यूझीलंडचेही पाच गुण असून त्यांचे दोन सामने बाकी आहेत. म्हणजेच न्यूझीलंडला एकूण 9 गुण मिळवण्याची संधी आहे, तर ऑस्ट्रेलियाला केवळ 7 गुण मिळवता आले आहेत.


या गटात इंग्लंडही शर्यतीत आहे. त्यांचे देखील दोन सामने बाकी आहेत. एक सामना न्यूझीलंडविरुद्ध आहे. म्हणजेच इंग्लंडने त्यांचे दोन्ही सामने जिंकले तर ऑस्ट्रेलियाचा खेळ खराब होईल आणि ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत असतील. अशावेळी न्यूझीलंड आणि इंग्लंडचा नेट-रन रेट ठरवेल की ते गटात नंबर-1 असतील की नंबर-2.


म्हणजेच टीम इंडिया आपल्या ग्रुपमध्ये नंबर-1 राहिली तर ती इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाशी टक्कर देऊ शकते. जर भारत आपल्या गटात नंबर-2 राहिला तर उपांत्य फेरीत न्यूझीलंड किंवा इंग्लंडशी सामना होऊ शकतो. म्हणजेच या समीकरणानुसार सर्वकाही घडले तर भारताला उपांत्य फेरीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडचा सामना करावा लागू शकतो.