T-20 World Cup 2023 साठी BCCI कडून टीम इंडियाची घोषणा
फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून (BCCI Announced India squad for ICC Womens T20 World Cup 2023)भारतीय संघाची घोषणा!
Womens World Cup 2023 : फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने (BCCI Announced India squad for ICC Womens T20 World Cup 2023) महिला भारतीय संघाची घोषणा केली आहे. यंदाचा टी-20 वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार असून 10 फेब्रुवारीला थराराला सुरूवात होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा असणार आहे. मागील वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने फायनलमध्ये (World Cup Final) धडक मारली होती. आता महिला भारतीय संघ वर्ल्ड कप आपल्या नावावर करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. (India squad for ICC Womens T20 World Cup 2023 & tri-series in South Africa announced)
दरम्यान, वर्ल्ड कपआधी वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये तिरंगी मालिका होणार आहे. तिंरगी मालिका 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारीपासून वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे व पुजा वस्त्राकर
राखीव खेळाडू-
एस. मेघना, स्नेह राणा आणि मेघना सिंग