India vs Pakistan : पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची भिडत येत्या 9 तारखेला होणार आहे. अशातच आता पाकिस्तानचा श्रीगणेशा होण्याआधी संघाला मोठा धक्का बसलाय. पाकिस्तान संघाकडून वाईट बातमी समोर आलीये. पाकिस्तानचा स्टार ऑलराऊंडर इमाद वसीम जायबंदी (Imad Wasim Ruled Out) झाल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे. इमाद वसीम पहिल्या सलामीच्या सामन्यासाठी तरी उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला (Babar Azam) टेन्शन आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान संघ 6 जून रोजी स्पर्धेतील आपल्या मोहिमेला (PAK vs USA) सुरुवात करेल. अशातच इमाद वसीम सलामीच्या सामन्यात सहभागी होणार नाही, यावर कॅप्टन बाबर आझम याने दुजोरा दिलाय. पाकिस्तानचा संघ टी-ट्वेंटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या मालिकेत दोन्ही संघांचे चार सामने झाले. यात पाकिस्तानला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याचवेळी इमाद जखमी झाला होता. त्याच्या बरगडीत दुखत होते, त्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आलं.


आमची मेडिकल पॅनलशी चर्चा झाली आहे, त्यामुळे मला वाटतं पुढच्या मॅचसाठी नाही, पण बाकीच्या मॅचसाठी तो हजर असेल, असं वक्तव्य पाकिस्तानच्या कॅप्टनने केलं आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कपआधीच पाकिस्तानला दुखापतीचं ग्रहण लागल्याचं पहायला मिळतंय.



पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान शाह माझे.


यूएसए - मोनांक पटेल (कर्णधार), आरोन जोन्स, अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोश्टुश केंजिगे, सौरभ नेथ्रालवकर, शॅडली व्हॅन शाल्क्विक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.