Troll Making Fun Of Babar Azam English: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्स नुकताच एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता जिथे पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमची मुलाखती घेण्यात आली. हा कार्यक्रम एका युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. दोघांनी मैदानावरील वेगवेगळ्या गोष्टींबरोबरच टी-20 वर्ल्डकप स्पर्धेबद्दल बऱ्याच गप्पा मारल्या. मात्र या गप्पांदरम्यान ए. बी. डिव्हिलियर्स एका गोष्टीवरुन प्रचंड चिडल्याचं पाहायला मिळालं. नेमकं घडलं काय आणि चिडल्यानंतर ए. बी. डिव्हिलियर्स काय म्हणाला हे जाणून घेऊयात.


कमेंट्समधून बाबरला केलं टार्गेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबर आझमच्या मुलाखतीदरम्यान काही चाहत्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये बाबरच्या इंग्रजीची खिल्ली उडवली. मात्र दक्षिण आफ्रिकेबरोबरच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून आयपीएल गाजवलेल्या ए. बी. डिव्हिलियर्सने ट्रोलर्सच्या या टीकेवरुन त्यांना कठोर शब्दांमध्ये कमेंट्स सेक्शनमधूनच खडे बोल सुनावले.


इंग्रजीवरुन उडवली बाबरची खिल्ली


बाबरच्या इंग्रजीची खिल्ली उडवताना ऋतिक गौरव नावाच्या एका भारतीय युझरने, 'ए. बी. डिव्हिलियर्स त्याला येणारं हसू लपवत आहे. बाबर आझम इंग्रजी बोलत असताना हे दिसून आलं,' असं म्हणत बाबरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पुढे या युझरने हसून हसून डोळ्यात पाणी आल्याचं दर्शवणारे इमोजी वापरले होते. मात्र या कमेंटला ए. बी. डिव्हिलियर्सने सणसणीत उत्तर दिलं. 


नक्की वाचा >> T20 World Cup: '..आणि हसत राहा', दमदार खेळीनंतर बॅड पॅचबद्दल हार्दिकचं सूचक विधान! 5 शब्दांची कॅप्शनही चर्चेत


ए. बी. डिव्हिलियर्स काय म्हणाला?


"माझ्या उर्दूपेक्षा त्याची इंग्रजी अमर्यादीत पटीने उत्तम आहे. त्याची फलंदाजी लाजवाब आहे. त्याची फलंदाजीच जास्त महत्त्वाची आहे, असं मला वाटतं," असा रिप्लाय ए. बी. डिव्हिलियर्सने बाबरला ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याला दिला.



टेनिस क्रिकेटचा महत्त्वाचा वाटा


ए. बी. डिव्हिलियर्सबरोबरच्या चर्चेदरम्यान बाबर आझमने त्याचं बालपण कसं गेलं आणि तो क्रिकेट कसा खेळू लागला हे त्याने सांगितलं. "मी क्रिकेटपटू होण्यात माझ्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. कारण मी क्रिकेट खेळू लागलो तेव्हा आमच्याकडे फारसे पैसे नव्हते. आमची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. मी सुरुवातीला राज्य स्तरीय क्रिकेट स्पर्धा खेळलो. त्यानंतर मी दर शनिवारी टेनिस बॉल तसेच टॅप बॉल क्रिकेट खेळायचो. आम्ही दोन टीम तयार करुन आलटून पालटून खेळायचो. याचा मला बराच फायदा झाला," असं बाबरने सांगितलं. प्रोफेश्नल क्रिकेटसंदर्भात बोलताना, "काही काळाने मी माझ्या वडिलांना मला प्रोफेशनल स्तरावरील क्रिकेट खेळायचं आहे, असं सांगितलं. त्यावेळेस त्यांनी मला होकार देत पाठिंबा दर्शवला. मी प्रोफेशनल क्रिकेट खेळण्यास सुरुवात केल्यानंतरचा काळ माझ्यासाठी फार कठीण गेला," असं बाबर म्हणाला.