T20 World Cup Semifinal India Playing-XI: टीम इंडियाने T20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता टीम इंडियाची लढत इंग्लंडशी होणार आहे. दरम्यान, क्रिकेटप्रेमी प्लेइंग-इलेव्हनबद्दल अनेकांना उत्सकता आहे. दिनेश कार्तिक या मोसमात फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे त्याला पुन्हा संधी मिळणार का की, ऋषभ पंतला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. या दोन खेळाडूंपैकी कोणाला कर्णधार रोहित शर्मा यष्टिरक्षकाची जागा देतो, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, नेट प्रॅक्टिसमधून काही गोष्टी नक्कीच स्पष्ट झाल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना 10 नोव्हेंबर रोजी अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे. 


पंतवर पुन्हा विश्वास रोहित दाखवणार का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅडलेडमध्ये होणाऱ्या T20 World Cup च्या सेमी फायनलच्या सामन्यात केवळ ऋषभ पंत यालाच संधी दिली जाऊ शकते. रोहित किमान एका सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल करणार नसल्याचे मानले जात आहे. ऋषभ पंत याने या स्पर्धेतील पहिला सामना मेलबर्नमध्ये झिम्बाब्वे विरुद्धच्या सुपर-12 फेरीच्या सामन्यात खेळला. जरी तो केवळ 3 धावा करु शकला आणि विकेटच्या मागे यश मिळाले नाही. तरीही, तो अनुभवी फिनिशर दिनेश कार्तिक याला पसंती मिळण्याऐवजी पंतला संधी मिळू शकते. तो पहिल्या चार सामन्यांमध्ये इलेव्हनचा भाग होता.


दिनेश कार्तिकचा जोरदार सराव  


दरम्यान, मंगळवारी दिनेश कार्तिक नेटमध्ये बराच वेळ फलंदाजी करताना दिसला. तरीही, सर्व-महत्त्वाच्या नॉकआऊट सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी ऋषभ पंत फेव्हरेट असल्याचे दिसते. ऋषभ पंतला प्राधान्य देणे म्हणजे हार्दिक पांड्याला फिनिशरची विशेष भूमिका बजावावी लागेल. पांड्याने पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-12 फेरीच्या सामन्यात 40 धावा केल्या आणि 3 बळीही घेतले. झिम्बाब्वेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पंड्याने 3 षटके टाकली आणि 16 धावांत दोन गडी बाद केले. 


सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे लक्ष


दरम्यान, रोहित शर्मा हा संघात फारसा बदल करणार नसल्याचे  बोलले जात आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये एका खेळाडूचे स्थान निश्चित दिसते, ते म्हणजे सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारने गेल्या सामन्यात जोरदार फलंदाजी करत 61 धावांची नाबाद खेळी केली. त्याने 25 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्याशिवाय सलामीवीर केएल राहुलने 35 चेंडूत 51 धावा केल्या. हार्दिकनेही 18 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 18 धावांचे योगदान दिले.