T20 World Cup : भावा, मला वाचवल्याबद्दल थँक्यू... दिनेश कार्तिक अश्विनला असं का म्हणाला? Video व्हायरल
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीम दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.
Dinesh Karthik On Ravichandran Ashwin: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) मिशन टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) धमाकेदार सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर (India vs Pakistan) 4 विकेटने विजय मिळवला. आत भारत आणि नेदरलँडदरम्यान (Indis vs Netherland) 27 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया सिडनीत दाखल झाली. यावेळचा एक व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आर अश्विनला (Ravichandran Ashwin) थँक्यू बोलताना दिसत आहे.
कार्तिक अश्विनला का म्हणाला थँक्यू?
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. मोहम्मद नवाजच्या (Mohammad Nawaz) पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बाद झाला. त्यानंतर बेस्ट फिनिशर म्हणून ओळखला जाणारा दिनेश कार्तिक मैदानावर आला. सर्वांचं लक्ष दिनेश कार्तिकच्या फलंदाजीवर लागलं होतं. पण पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिक स्टंप आऊट झाला आणि करोडो भारतीय चाहत्यांची निराशा झाली. कार्तिक बाद झाल्यानंतर आर अश्विन मैदानावर आला. अश्विनने विजयी धाव घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. याच कारणाने कार्तिकने अश्विनला थँख्यू म्हटलं. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत कार्तिक अश्विनला मला वाचवल्याबद्दल थँक्यू असं म्हणताना दिसत आहे.
आयपीएलमध्ये कार्तिकची जबरदस्त खेळी
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात (IPL 2022) दिनेश कार्तिकने जबरदस्त कामगिरी केली होती. एक हाती सामना जिंकत कार्तिकने आरसीबीला (RCB) अनेक सामने जिंकून दिले. याच खेळीच्या जोरावर कार्तिकने टीम इंडियात आपली जागा पक्की केली. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. 2007 च्या पहिल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये दिनेश कार्तिक खेळला होता.
भारताचा ऐतिहासिक विजय
टी20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या आपल्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नाबाद 82 धावांची खेळी करत टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. तर हार्दिक पांड्याने 40 धावा करत विराटला मोलाची साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. अर्शदीप सिंहने सुरुवातीलाच बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानची विकेट घेत पाकिस्तानवर दबाव वाढवला.