T20 World Cup : विश्वचषक काही दिवसांवर आला असताना संघाना खेळाडूंच्या दुखापतीमुळे धक्का बसत आहे. बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडल्याने भारतीय संघाला त्याची जागा भरुन काढणार बुमराहच्या तोडीचा गोलंदाज नाही. दुखापतीचं विघ्न भारतीय संघाच्याच नाहीतर इंग्लंड संघाच्याही पाठीमागे लागलं आहे. इग्लंंड संघाचा दुसरा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. (England star batter jonny bairstow out of t20 world cup his injury marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलर्सला सळो की पळो करून सोडणारा इंग्लंडचा फलंदाज आणि कीपर जॉनी बेअरस्टो दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. दुखापतीबाबत बेअरस्टोने आपल्या इंन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये दिसत आहे की त्याचा पाय हा सुजलेला असून त्याला उभं राहणंही कठीण झालं आहे. 


 



माझा पाय तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून माझा घोटाही निखळला आहे. ज्यासाठी ऑपरेशन करणं गरजेचं होतं. दोन्ही पायांवर उभे राहून सर्व काही ठीक असल्याची खात्री करणार आहे. तुमचं सर्वांचं प्रेम आणि पाठिंबा असाच मिळत राहो, असं जॉनी बेअरस्टोने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. बेअरस्टोला गोल्फ खेळताना दुखापत झाल्याची माहिती आहे.


 



दरम्यान, इंग्लंड संघासाठी हा दुसरा मोठा धक्का आहे. याआधी जोफ्रा आर्चर आणि आता जॉनी बेअरस्टो हे दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर पडले आहेत. इंग्लंड टीम मॅनेजमेंट कशा प्रकारे आता संघाची बांधणी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.