T20 World Cup : इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला महेंद्रसिंह धोनीचा `हा` रेकॉर्ड
इंग्लंडच्या स्टार खेळाडूनं मोडला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा हा रेकॉर्ड, चाहत्यांमध्ये नाराजी
दुबई: टी 20 वर्ल्ड कप UAE मध्ये सुरू आहे. यंदाचा वर्ल्ड कप खऱ्या अर्थाने चुरशीच्या आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाने जवळपास आपली सेमीफायनलमधील जागा पक्की केली आहे. आता उर्वरित संघांपैकी कोण सेमीफायनलपर्यंत पोहोचणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंग्लंड संघ श्रीलंकेविरुद्ध 26 धावांनी जिंकून सेमीफायनल पर्यंत पोहोचला आहे.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका झालेल्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. मॉर्गनने धोनीचा एक खास विक्रम मोडला आहे. हा विक्रम मोडून धोनीने अफगाणिस्तानच्या माजी कर्णधाराशी देखील रेकॉर्डच्या बाबतीत बरोबरी केली आहे.
T20 वर्ल्ड कपमध्ये महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाचा मेंटर आहे. टी-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये धोनीने 72 सामन्यांमध्ये कर्णधार असताना 42 सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. हा रेकॉर्ड धोनीच्या नावावर होता. मात्र अफगाणिस्तानच्या अफगाण असगरनं हा रेकॉर्ड मोडत 43 सामने जिंकवून दिले होते.
महेंद्रसिंह धोनीचा हा रेकॉर्ड आता इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गनने मोडला आहे. श्रीलंकेचा पराभव करताच टी-20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनला. त्याने 68 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवताना आपल्या संघाला 43 वा विजय मिळवून दिला. अशाप्रकारे मॉर्गन टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार ठरला आहे.
धोनीने टीम इंडियाला 2007 टी-20 वर्ल्डकप आणि 2011 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. मॉर्गनने इंग्लंडला 2019 च्या विश्वचषकाचे विजेतेपदही मिळवून दिलं आहे. आता असगर अफगाण आणि इयोन मॉर्गन दोघांनी मिळून हा रेकॉर्ड मोडल्याने चाहत्यांची काहीशी निराशा झाली आहे.
इंग्लंड संघाने सलग चौथा विजय मिळवला आहे. याआधीचे सामनेही इंग्लंड संघ जिंकला होता. तर दुसऱ्या ग्रूपमध्ये पाकिस्तान संघ सलग चौथा सामना जिंकला आहे. यंदा इंग्लंड आणि पाकिस्तान टीमला लागोपाठ विजय मिळवण्यात यश मिळत आहे. टीम इंडियाला मात्र अद्याप एकही सामना जिंकण्यात यश आलं नाही. पाकिस्तान विरुद्ध 10 तर न्यूझीलंड विरुद्ध 8 विकेट्सने टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला आहे.