T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकप स्पर्धा रंगात आली आहे. ग्रुप स्टेजमधील उलटफेर पाहता रंगत येत्या काही दिवसात आणखी वाढत जाणार आहे. सुपर 12 फेरीत असलेला प्रत्येक संघ जेतेपदावर दावा ठोकत आहे. त्यामुळे आजी-माजी खेळाडू हा वर्ल्डकप कोण जिंकणार? याबाबत आपलं भाकीत वर्तवत आहे. भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. आता 19 ऑक्टोबरला टीम इंडियाचा दुसरा सराव सामना न्यूझीलंडशी (Australia Vs Newzealand) होणार आहे. त्यानंतर सुपर-12 फेरीत (Super 12) भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेपूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) या दोन संघांना पसंती दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू टॉम मूडी (Tom Moody) यानेही या दोन संघांना पसंती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्यादरम्यान गावसकर यांनी एका चॅनेलवर सांगितलं की, "भारत नक्कीच पहिली पसंती आहे आणि होम ग्राऊंड असल्याने ऑस्ट्रेलियाला दुसरी पसंती असेल."  दुसरीकडे टॉम मूडी यांनी सांगितलं की, "ऑस्ट्रेलिया, इंग्लंड त्यांच्या गटातून उपांत्य फेरीत पोहोचतील. दुसऱ्या गटातून पाकिस्तान आणि भारत उपांत्य फेरीत पोहोचतील. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत अंतिम फेरीत पोहोचतील."


T20 WC Ind Vs Aus: "डेथ ओव्हर शमीला देणं...", विजयानंतर कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गणित


भारतीय संघ- केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर. अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, दीपक हुड्डा