Video : Ind vs Zim सामन्यात विराट कोहलीने धरली छाती; चाहत्यांची वाढली चिंता
,सामन्यामध्येच विराट दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता
Ind vs Zim : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (t20 world cup 2022) भारतीय संघाने रविवारी झिम्बाब्वेच्या (ind vs zim) संघाला 71 धावांनी पराभूत करत धूळ चारली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या (south africa) पराभवानंतर भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधीच उपांत्य फेरीत (semi final) स्थान मिळवलं होतं. टी-20 विश्वचषक 2022 सुपर-12 मधील शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा (ind vs zim) 71 धावांनी पराभव केला. भारताने टॉस (Toss) जिंकत फलंदाजीचा निर्णय घेत झिम्बाब्वेसमोर (zimbabwe) विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येसमोर झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 115 धावांवर गारद झाला. या विजयासह भारतीय संघ (Team India) ग्रुप 2 च्या गुणतालिकेत (points table) अव्वल स्थानावर कायम आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी (ind vs eng) होणार आहे. (t20 world cup Ind vs Zim Virat Kohli heolding his chest in while batting)
विराट कोहली (virat kohli) हा क्रिझवर जगातील सर्वात वेगवान धावपटू मानला जातो. विराट कोहली हा एका धावेचे दोन धावांमध्ये आणि दोन धावांचे तीन धावांमध्ये रुपांतर करण्यात फारच पटाईत आहे जे सर्वांनाच जमत नाही. या विश्वचषकात (t20 world cup) विराट कोहली चांगल्या फॉर्मात दिसत आहे. विराट कोहली सध्या वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विराटबाबत एक विचित्र प्रकार समोर आलाय.
T20 WC : दक्षिण आफ्रिकेच्या संघाला वर्ल्डकपमध्ये चोकर्स का म्हणतात?
विराटने धरली छाती
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात 25 चेंडूत 26 धावा करणारा विराट कोहली मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर धाव घेतल्यानंतर छातीला हात लावताना दिसला. 5 नोव्हेंबर रोजीच विराटने 34 व्या वर्षात पदार्पण केले आहे पण खेळण्याच्या शैलीवरुन त्याच्या फिटनेसबाबत कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यादरम्यान धाव घेतल्यानंतर विराट थोडासा अस्वस्थ दिसत होता. मात्र, याबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये विराटाने सिंगल घेतल्यानंतर छाती चोळताना दिसला घासताना दिसला आणि दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून त्याचे चाहते थोडेसे चिंतेत पडले. पण विराटने पुन्हा खेळायला सुरुवात केली आणि आपल्या फॉर्ममध्ये तो परतला.
तो फक्त श्वास घेत होता - सुनील गावसकर
यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी समालोचन करताना विराटच्या या कृतीबाबत भाष्य केले. दुसरी धाव काढणे कायमच कठिण असते आणि विराट फक्त श्वास घेत आहे म्हणत सर्व शक्यता फेटाळून लावल्या. "विराट विकेट्सच्या दरम्यान खूप वेगाने धावतो. तो नेहमी अतिरिक्त धावांच्या शोधात असतो. ज्या क्षणी त्याने हा चेंडू खेळला, तेव्हा त्याला माहित होते की क्षेत्ररक्षक कुठे आहे आणि म्हणून त्याला वाटलं की दुसरी धाव घ्यावी पण त्याने ती घेतली नाही. त्यानंतर तो थोडा श्वास घेत होता," असे सुनील गावसकर म्हणाले.
"शेवटी भगव्यानेच पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्ये जायला मदत केली"
दरम्यान, या साम्यानत केएल राहुलसह सूर्यकुमार यादवने भारताला 186 धावांपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलला. राहुलने 35 चेंडूत 51 धावा केल्या, तर सूर्यकुमारने 25 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी केली. मधल्या षटकात राहुल आणि कोहली बाद झाल्यानंतर भारताच्या धावांचा वेग मंदावला होता, पण सूर्याने शेवटच्या 5 षटकांत ही कसर भरून काढली. भारताने शेवटच्या पाच षटकात 79 धावा केल्या.