"शेवटी भगव्यानेच पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्ये जायला मदत केली"

पाकिस्तान संघाला शेवटी भगव्यानेच मदत केल मदत!

Updated: Nov 6, 2022, 06:52 PM IST
"शेवटी भगव्यानेच पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्ये जायला मदत केली" title=

T-20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्ड कपमधील दुसऱ्या ग्रुपमधील आजच्या सामन्यांमधील नेदरलँड संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. (Netherlands vs South Africa) दक्षिण आफ्रिकेचा संघ या पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाला याचा फायदा झालेला आहे. कारण पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवत उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. पाकिस्तान संघाने स्वप्नातही विचार केला नसेल  नेदरलँडमुळे त्यांना उपांत्य फेरीची दारे उघडे होतील. याच पार्श्वभूमीवर माजी खेळाडू व्यंकटेश प्रसादने एक खास ट्विट केलं आहे. (T-20 world cup 2022 so bhagwa has helped pakistan reach the semis venkatesh prasad tweet goes viral Latets marathi Sport News)

भगव्यानेच पाकिस्तान संघाला सेमी फायनलमध्ये जायला मदत केली, असं व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटलं आहे. याबाबत प्रसाद यांनी ट्विट केलं आहे. सुरूवातीला त्यांना काय म्हणायंचय हे समजलं नाही. तसं पाहायला गेलं तर नेदरलँड संघाच्या जर्सीचा रंग हा भगवा आहे याचाच धागा पकडत व्यंकटेश प्रसाद यांनी पाकिस्तान संघाला टोला लगावला आहे.  

जेव्हा विश्वचषक आणि भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सामना येतो तेव्हा व्यंकटेश प्रसादचे नाव नेहमी डोळ्यासमोर येते. 1996 च्या विश्वचषकात व्यंकटेश प्रसादने अमीर सोहेलला ज्या प्रकारे बाद केले ते कोणताही भारतीय क्रिकेट चाहता विसरू शकत नाही. परंतु 2022 च्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर हे ट्विट केलं आहे.