T20 World Cup : काय सांगावं, वडिलांसाठी लेकाला यशस्वी झालेलं पाहणं किती आनंदाचं असतं.... दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) वडिलांची एक कृती पाहून तुम्हालाही याचा अंदाज येईल यात शंका नाही. तिथे भारतीय संघ (Team India) सिडनीमध्ये (Sydney) सरावाला कधी येतो याची प्रतीक्षा करत कृष्ण कुमार म्हणजेच दिनेश कार्तिकचे वडील एका कोपऱ्यात उभे होते, इतर क्रिकेटप्रेमींच्या गर्दीत तेसुद्धा होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुतूहलापोटी त्यांनी मोबाईलचा कॅमेरा सुरु केला. त्यांचं लक्ष कोणा दुसऱ्या खेळाडूवर नव्हतंच. कारण, ते लेकाला पाहण्यात रमले होते. कॅमेरा सुरु केला, पण तिथे मोबाईलचा वापर करण्याची परवानगी नसल्याची बाब त्यांच्य निदर्शनास आणण्यात आली आणि तेव्हाच ही व्यक्ती दुसरीतिसरी कोण नसून, खुद्द दिनेश कार्तिकचे वडील कृष्ण कुमार आहेत हे उघड झालं.


अधिक वाचा : T20 World Cup : Ins vs Pak सामन्यानंतर बाबर आझमच्या ‘त्या’ कृतीने सर्वांना आठवला धोनी, नक्की काय झालं?


कार्तिकचे बाबा तिथे आहेत हे कळताच अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठलं. यावेशळी त्यांनीही अनेकांशी संवाद साधला. कार्तिकचे आईवडील सहसा त्याचे सामने पाहण्यासाठी येतात. भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) सामना मात्र त्यांना पाहता आला नाही, कारण त्यावेळी ते प्रवास करत होते. मुलगा तिथे क्रिकेट जगतात दमदार कामगिरी करत असताना त्याला कौतुकानं पाहणाऱ्या आणि सर्वसामान्यांप्रमाणेच कोणताही दिखावा न करता तिथे वावरणाऱ्या कृष्ण कुमार यांच्या साधेपणाचा सर्वांनाच हेवा वाटतोय.


कार्तिक संघाचा Finisher


टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) कार्तिकला भारतीय संघात फिनिशरची भूमिका देण्यात आली आहे. एरव्हीसुद्धा त्यानं गरजेच्या वेळी संघाला अपेक्षित शेवट दिला आहे. त्यामुळं निवड समिती आणि संघानंही त्याच्यावर विश्वास ठेवत यावेळीसुद्धा Finisher म्हणून निवडलं आहे. शिवाय तो संघासाठी Wicket Keeper म्हणूनही चांगली कामगिरी बजावताना दिसत आहे. 



भारतीय संघासाठी कार्तिक आतापर्यंत 26 कसोटी सामने, 94 एकदिवसीय सामने आणि 57 टी20 सामने खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं भारतीय संघासाठी 1025 धावा केल्या. तर , एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 1752 धावांचं योगदान दिलं आहे. टी20 सामन्यांमध्ये त्यानं 673 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिक या वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमध्ये तुलनेनं कमी सक्रिय दिसू शकतो. त्यामुळं सध्याची स्पर्धा त्याच्यासाठी अतिशय खास आहे.