मुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. भारत पाकिस्तान सामना हा मैदानापुरता मर्यादीत नाही तर देशप्रेमापर्यंत त्याचा संबंध जोडला जातो. टी 20 वर्ल्ड कपसाठी नुकतेच आयसीसीने ग्रूप जाहीर केले. त्यानंतर काही जुने टी 20 वर्ल्डकपचे व्हिड़ीओ पुन्हा एकदा ट्रेन्डिंगमध्ये आले आहेत. यामध्ये एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओची चर्चा यासाठी आहे की 2007 मध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कप दरम्यान धोनीनं पाकिस्तानच्या खेळाडूला रडवलं होतं. पाकिस्तानचा फलंदाज क्रिझवर रडला होता. त्यावेळीचे काही क्षण असे होते ज्यामुळे धोनी आणि टीम इंडियाने चाहत्यांची मनं जिंकली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. 



2007 मध्य़े पाकिस्तानचा संघ टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. भारत विरुद्ध पाकिस्तान अशी लढत होती. या सामन्यात धोनीनं मैदानात अशी फील्डिंग लावली की क्रिझवर खेळणारा फलंदाज सिक्स मारता मारता कॅच आऊट झाला. त्यावेळी पाकिस्तानला जिंकण्यासाठी 158 धावांची गरज होती. एक रन कमी पडल्याने पाकिस्तान संघ पराभूत झाला.


शेवटच्या 13 धावांची पाकिस्तानला जिंकण्यासाठी गरज होती. त्याच वेळी क्रीजवर मिसबाह उल हक खेळत होता. त्याने जो स्विप मारला तो पाहून एक क्षण वाटेल की सिक्स गेला. मात्र तो कॅच आऊट झाला. त्यामुळे मिसबाल उल हक क्रिझवर बसून रडू लागला.