T20 वर्ल्ड कप : रोहित-विराट नाही, तर हे 3 खेळाडू भारतासाठी ठरणार महत्त्वाचे
टी-20 विश्वचषकाचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. टीम इंडिया ही स्पर्धा जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे.
मुंबई : टी-20 विश्वचषकाचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. टीम इंडिया ही स्पर्धा जिंकण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. विराट कोहली त्याच्या नेतृत्वाखाली भारताला आयसीसीचे कोणतेही विजेतेपद मिळवून देऊ शकलेला नाही. पण यावेळी त्याच्या संघात अनेक खेळाडूंचा समावेश आहे. जे विश्वचषक ट्रॉफी भारतासाठी जिंकून आणू शकतील.
केएल राहुल
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर केएल राहुल दमदार फॉर्ममध्ये आहे. राहुल सलग दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने पंजाब किंग्जकडून खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 626 धावा केल्या, त्यात शेवटच्या सामन्यात चेन्नईविरुद्ध 98 धावांच्या खेळीचा समावेश होता. शिखर धवनच्या अनुपस्थितीत तो रोहितसोबत सलामीला जाईल. याशिवाय तो मधल्या फळीत कुठेही फलंदाजी करू शकतो. त्याच्याकडे विकेट धरून ठेवण्याची क्षमता आहे.
रवींद्र जडेजा
रवींद्र जडेजाने आपल्या कामगिरीने चेन्नईला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. कोहलीला असे वाटते की त्याने अशीच कामगिरी करत राहावी. जडेजाने चेन्नईसाठी 15 सामन्यांत 11 बळी घेतले आणि 227 उपयुक्त धावा केल्या. डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या झंझावाती फलंदाजीमुळे त्याने महत्त्वाच्या प्रसंगी आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढले, टीम इंडिया त्याच्याकडून त्याच कामगिरीची अपेक्षा करेल. यूएईच्या फिरकी खेळपट्ट्यांवर जडेजा संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
वरुण चक्रवर्ती
वरुण चक्रवर्तीने 2021 च्या आयपीएलमध्ये फलंदाजांना चांगलंच हैराण केलं आहे. तो एक रहस्यमय फिरकीपटू म्हणून उदयास आला आहे, या लेग स्पिनरने कोलकाता संघासाठी 15 सामन्यात 16 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. तो अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याने 6.40 च्या उत्कृष्ट सरासरीने गोलंदाजी केली. वरुण वर्ल्डकपमध्ये भारतासाठी खूप महत्त्वाचा सिद्ध होईल.