टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup) उपांत्य फेरीत भारताला लाजिरवाणा पराभव स्विकारुन स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. इंग्लंडने भारताचा (ind vs eng) एकतर्फी सामन्यात 10 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय क्रिकेट संघाना नऊ वर्षानंतरही उपांत्य फेरीचा (semi final) अडथळा दूर करण्यात अपयश आलं. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये भारतीय संघाने अतिशय निराशाजनक कामगिरी केली. अ‍ॅलेक्स हेल्स (alex hales) आणि जोस बटलर (jos buttler) यांच्या बळावर इंग्लंडने सेमीफायनमध्ये भारताचा 10 गडी राखून पराभव केला.  इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी भारतीय गोलंदाजांना चांगलांच धोबीपछाड दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वचषक 2022 चा अंतिम सामना आज एमसीजी (MCG) येथे पाकिस्तान आणि इंग्लंड (Pak vs Eng) यांच्यात होणार आहे. अशा स्थितीत इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज फलंदाजीने दमदार कामगिरी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सलामीवीर अॅलेक्स हेल्स आणि जॉस बटलर हे पाकिस्तानसाठी फारसे धोक्याचे ठरणार नाहीत. उपांत्य फेरीच्या सामन्यात दोघांनीच भारतीय संघाना नमवलं असले, तरी पाकिस्तानी संघाला त्यांची फारशी भीती वाटत नाहीये. कारण या दोन फलंदाजांचा पाकिस्तानविरुद्ध फारसा चांगला खेळ करता आलेला नाही.


हे ही वाचा >> '...बरं वाटत नाहीये'; T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर विराटचे 10 वर्षापूर्वीच ट्विट व्हायरल


इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड चांगला नाही. बटलरने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत 8 सामने खेळले असून, त्याने 18.50 च्या सरासरीने एकूण 148 धावा केल्या आहेत. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध फक्त एक अर्धशतक झळकावले आहे आणि त्याचा स्ट्राइक रेट 117.46 आहे, जो त्याच्या कारकिर्दीच्या स्ट्राइक रेटपेक्षा खूपच कमी आहे.


हे ही वाचा >> तुम्ही IPL खेळता तेव्हा कामाचा ताण नसतो का?


तर अॅलेक्स हेल्सही पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तितकासा यशस्वी ठरलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध अॅलेक्सने आतापर्यंत 9 सामन्यांत 186 धावा केल्या आहेत. हेल्सने पाकिस्तानविरुद्ध केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. त्याचा स्ट्राइकरेट 134.78 आहे. जो करिअरच्या स्ट्राइकरेटपेक्षा थोडा कमी आहे. यामुळेच पाकिस्तानी संघाला या दोघांची तितकी काळजी नसणार आहे.