T20 World Cup: पाकिस्तानच्या नवीन जर्सीचे फोटो लीक, चाहत्यांनी उडवली खिल्ली
पाकिस्तान संघ नवीन जर्सीवरून का होतोय ट्रोल, फोटो पाहिलात का तुम्ही?
मुंबई : आगामी टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) सध्या सर्वंच संघ सज्ज झाले आहेत. अनेक संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. तर काही संघांनी वर्ल्डकपसाठी आपली नवीन जर्सीही लाँच केली आहे. टीम इंडियानेच (Team India) नुकतीच आपली जर्सी लाँच केली होती. यानंतर आता पाकिस्तान संघाने (Pakistan) नवीन जर्सी लाँच केल्याची माहीती सुत्रांकडून मिळत आहे. या संबंधित पाकिस्तान संघाच्या नवीन जर्सीचे फोटो लीक झाले आहेत. हे फोटो समोर येताच आता पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली जात आहे.
प्रकरण काय?
सोशल मीडियावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि इतर काही खेळाडूंच्या नव्या टी-शर्टमधील फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो पाहुन चाहते खिल्ली उडवत आहेत. फोटोमध्ये बाबर आझमचा (Babar Azam) नवीन जर्सीतला फोटो आणि टरबूजाचा फोटो दिसत आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करून खिल्ली उडवली आहे. चाहत्यांनी टरबूजचे डिझाइन आणि त्यानुसार वर्ल्ड कप जर्सी बनविल्याची खिल्ली उडवली आहे. दरम्यान बाबर आझमचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
विशेष म्हणजे, पाकिस्तानने (Pakistan) अद्याप अधिकृतपणे नवीन जर्सी लाँच केलेली नाही आहे. मात्र नवीन जर्सीतले काही फोटो लीक झाल्याचे बोलल जात आहे.
दरम्यान टीम इंडियाने (Team India) रविवारीच आपली नवीन जर्सी लाँच केली होती. कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह इतर स्टार खेळाडूंच्या उपस्थितीत टीम इंडियाची नवीन जर्सी लॉन्च करण्यात आली होती, जी आकाशी निळ्या रंगाची आहे.
T20 वर्ल्डकप संघ
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.
पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , उस्मान कादिर.
स्टँडबाय खेळाडू : मोहम्मद हरीस, फखर जमान आणि शाहनवाज दहनी.