India vs England T20 World Cup 2022: भारत आणि इंग्लंडदरम्यान गुरुवारी सेमीफायनल (Semifinal) रंगणार आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडचा (Pakistan vs New Zealand) पराभव करत फायनल गाठलीय, आता करोडो क्रिकेट प्रेमींचं लक्ष टीम इंडियाच्या कामगिरीवर लागलं आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार का याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यानचा सेमीफायनलचा हा सामना एडलेडच्या ओव्हल मैदानावर (Adelaide Oval Cricket Ground) खेळला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली अडचणीत
सेमीफायनलसाठी टीम इंडिया एडलेडमध्ये दाखल झाली. या सामन्याआधी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी भारतीय खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांसाटी डिनर पार्टीचं (Dinner Party) आयोजन केलं होतं. डिनर पार्टीनंतर रेस्टॉरंटच्या बाहेर येताना विराट कोहलीला चाहत्यांनी घेरलं. विराट कोहलीबरोबर फोटो काढण्यासाठी आणि त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी विराटला स्थानिक पोलिसांची (Police) मदत घ्यावी लागली. पोलिसांनी सुरक्षा कडं करत विराटला बसपर्यंत नेलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. 


खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी डिनर पार्टी
सेमीफायनलआधी खेळाडूंवरचं दडपण काही प्रमाणात कमी व्हावं आणि त्यांचं मनोबल वाढावं या उद्देशाने राहूल द्रविड यांनी डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत भारतीय खेळाडू आणि त्यांचं कुटुंबिय तसंच सपोर्ट स्टाफचा समावेश होता. ज्या रेस्टोरंटमध्ये डिनर पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याचं नाव 'ब्रिटिश राज' असं आहे. या रेस्टोरंटमध्ये भारतीय पद्धतीचं जेवणही मिळतं.


फायनल गाठण्यासाठी सज्ज
भारत आणि इंग्लंडदरम्यान गुरुवारी म्हणजे उद्या ओव्हलमध्ये सेमीफायनलची लढत होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ 13 नोव्हेंबरला फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध दोन हात करेल. पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे.