T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात मोठे बदल? या 3 खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता?
या आयपीएल हंगामात काही खेळाडू आहेत, ज्यांच्या खराब फॉर्ममुळे त्यांच्या टीममधील जागेला आता धोका निर्माण झाला आहे.
मुंबई : टी -20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा 8 सप्टेंबरलाच झाली. परंतु आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील काही खेळाडूंच्या खराब कामगिरी पाहाता निवडकर्ते संघात बदल करण्यास भाग पाडले आहेत. आयसीसीच्या नियमांनुसार सर्व देश 10 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करू शकतात. म्हणजेच टीमबद्दल पुन्हा एकदा विचार करण्याची संधी बीसीसीआयकडे आहे यासाठी त्यांच्याकडे सुमारे 2 आठवडे शिल्लक आहेत.
टी 20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या आयपीएल हंगामात काही खेळाडू आहेत, ज्यांच्या खराब फॉर्ममुळे त्यांच्या टीममधील जागेला आता धोका निर्माण झाला आहे. टीममधील हे कोणते खेळू आहेत ते जाणून घेऊयात.
हार्दिक पंड्या
टी 20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्या ना खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे आणि ना तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. हार्दिक पंड्याची खराब फिटनेस स्टेटस असूनही, भारतीय निवडकर्त्यांनी त्याची टी -20 विश्वचषक संघासाठी निवड केली आहे, कारण त्याच्याकडे सामने फिरवण्याची शक्ती आहे.
हार्दिक पंड्या अनफिट असल्याने शार्दुल ठाकूरला याचा फायदा होऊ शकतो. शार्दुल ठाकूरचा सध्याचा फॉर्म शानदार आहे आणि तो टीम इंडियासाठी एक मजबूत अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील काम करु शकतो. परंतु असे असले तरी, शार्दुल ठाकूरला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या खेळला नाही तर शार्दुल ठाकूरला संधी मिळण्याची खात्री आहे.
भुवनेश्वर कुमार
भुवनेश्वर कुमारची कामगिरी टी -20 वर्ल्ड कपच्या अगदी आधीच उघड झाली आहे. आयपीएलमध्ये भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी पाहून कोणत्याही फलंदाजाला समस्या किंवा प्रॉबलम येत आहे असे काही दिसत नाही. भुवनेश्वर कुमार अजिबात फॉर्ममध्ये नाही. भुवनेश्वर कुमारची कामगिरी पाहता त्याला टी -20 वर्ल्ड कप संघात स्थान मिळणार नाही असी शक्यता वर्तवली जात आहे.
भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीत ना वेग आहे आणि ना तो गोलंदाजीने विरोधी फलंदाजांमध्ये भीती निर्माण करू शकत आहे. अशा परिस्थितीत निवडकर्ते मोहम्मद सिराज आणि टी नटराजन सारख्या वेगवान गोलंदाजांना संधी देऊ शकतात.
ईशान किशन
ईशान किशनचा फ्लॉप शो टी -20 वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाल्यापासून सुरू आहे. इशान किशनसाठी, निवडकर्त्यांनी शिखर धवनला टी -20 विश्वचषक संघातून बाद केले होते. इशान किशनची आयपीएलमधील खराब कामगिरी सुरूच आहे. ही खराब कामगिरी पाहता धवनच्या प्रवेशाची शक्यता आहे.
आयसीसीने जारी केलेल्या नियमांनुसार टीम व्यवस्थापन अजूनही आपल्या संघात बदल करू शकते. अशा स्थितीत इशान किशनला टी -20 विश्वचषक संघातून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.