मुंबई :  टी20 वर्ल्डकप 2022 ( T20 Wolrd cup 2022 ) अखेर इंग्लंड संघाने ( England Team Win ) जिंकत विक्रम नोंदवला आहे. इंग्लंड दुसऱ्यांना टी20 वर्ल्डकप जिंकणारा संघ ठरला आहे. याआधी ही कामगिरी फक्त वेस्ट इंडिजच्या नावावर होती. इंग्लंडने पाकिस्तान संघाचा 5 विकेटसने पराभव केला. आजच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. तर टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli ) यंदा सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघ जरी फायनलपर्यंत पोहोचला असला तरी कर्णधार बाबर आझम या स्पर्धेतील सर्वात फ्लॉप फलंदाज ठरला. मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना केवळ 137 धावा केल्या. या विश्वचषकात अत्यंत खराब फॉर्ममध्ये दिसणारा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने फायनलमध्ये 28 बॉलमध्ये फक्त 32 धावा केल्या.


बाबर आझमची कामगिरी संथ ठरली. ज्या पहिल्या 1 ते 6 ओव्हरमध्ये फास्ट इनिंग खेळायची असते. त्या दरम्यान तो सर्वात संथ खेळला. आकडेवारीनुसार, स्पर्धेच्या सुपर-12 फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत, पॉवरप्लेमध्ये बाबरचा स्ट्राइक रेट फक्त 80.0 होता.


आशिया कप 2022 पासून बाबर आझमचा खराब फॉर्म सुरु झाला. त्या स्पर्धेतही पाकिस्तानी कर्णधार पूर्णपणे फ्लॉप दिसला. त्याने 6 डावात 17.71 च्या सरासरीने केवळ 124 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट फक्त 93 होता. बाबरने स्पर्धेत 13 चौकार मारले मात्र त्याला एकही षटकार मारता आला नाही.


दुसरीकडे भारताचा फलंदाज विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये होता. विराट कोहलीने या टी20 वर्ल्डकप मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोहलीने या विश्वचषकाच्या सहा डावांमध्ये 98.66 च्या सरासरीने 296 धावा केल्या. त्याने चार अर्धशतके झळकावली. कोहलीची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 82 रन होती. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ही खेळी खेळली आणि पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला. यासह कोहली दोन टी-20 विश्वचषकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. 2014 आणि 2022 मध्ये त्यांनी हा विक्रम केलाय.