पर्थ : यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियात (Australia) पार पडणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) सर्वंच संघ सज्ज झाले आहेत. टीम इंडिया (Team India) सुद्धा काहीच दिवसांपुर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाली होती. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे विराट ही संधी बळकावतो का? हे येणाऱ्या वर्ल्ड कपमध्येच कळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या साधारण अडीच वर्ष विराट (Virat Kohli) आऊट ऑफ फॉर्म होता. त्याच्या बॅटीतून रन्स येत नव्हते. शतकांचा मोठा दुष्काळ पडला होता. मात्र आशिया कपमध्ये त्याने पुनरागमन करत शतकांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर गेल्या अनेक सामन्यातून तो फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत देत आहे. त्याचा हा फॉर्म कायम राहिला तर तो अनेक विक्रम त्याच्या नावे करू शकतो. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) त्याला अनेक विक्रमांना गवसणी घालण्याची संधी आहे. 


सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय धावा: 
सध्या सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय धावा करण्यात रोहित आघाडीवर आहे. त्याच्या खात्यात 3 हजार 737 T20 आंतरराष्ट्रीय धावांची नोंद आहे. विराट कोहली (Virat Kohli) त्याच्यापेक्षा थोडा मागे आहे. विराटच्या खात्यात 3 हजार 712 धावा आहेत.दोघांच्या फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर विराट सध्या रोहितपेक्षा चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि अशा परिस्थितीत तो लवकरच हा विश्वविक्रम आपल्या नावे करू शकतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.


सर्वाधिक चौकार: 
T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहली दोन खेळाडूंच्या मागे आहे. पॉल स्टर्लिंगच्या खात्यात 344 चौकार आहेत, तर रोहितच्या खात्यात 337 चौकार आहेत. विराट कोहली (Virat Kohli) 331 चौकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीने आपला फॉर्म कायम ठेवला तर तो या रॅकिंगमध्ये पहिला क्रमांक गाठू शकतो. 


ऑस्ट्रेलियातील विदेशी फलंदाजांची सर्वोत्तम सरासरी :
विराटला (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर खेळणे किती आवडते, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. जर आपण ऑस्ट्रेलियन भूमीवर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये परदेशी फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोललो, तर सरासरीच्या बाबतीत फक्त इफ्तिखार अहमद, असाला गुणरत्ने आणि जेपी ड्युमिनी विराटच्या पुढे आहेत.


गुणरत्ने आणि ड्युमिनी T20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार नाहीत, इफ्तिखार पाकिस्तानकडून खेळणार असला तरी त्याचा फॉर्म काही खास नाही. विराटने ऑस्ट्रेलियामध्ये 64.42 च्या सरासरीने एकूण 451 T20 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. सरासरीच्या बाबतीतही तो नंबर-1 बनू शकतो.


दरम्यान येत्या 16 ऑक्टोबरपासून या वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा (Team India) पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सला उत्सुकता लागली आहे.