T20 WC: अनुष्का शर्माच्या भावनिक पोस्टवर विराट कोहलीची प्रतिक्रिया, म्हणाला कठिण काळात...
विराट कोहलीसाठी अनुष्का शर्माने केलेल्या पोस्टला आतापर्यंत 53 लाख लाईक्स, विराटच्या पोस्टलाही मिळतेय पसंती
Virat Kohli on Anushka Insta Post: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा (India vs Pakistan) क्रिकेट सामना चुरशीचा होणार यात शंका नसते. टी20 वर्ल्ड कपमधला (T20 World Cup) रविवारचा सामनाही याला अपवाद नव्हता. या सामन्यात अॅक्शन, ड्रामा, थ्रिल सर्व काही होतं. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानवर (India Beat Pakistan) विजय मिळवला आणि देशात एकच जल्लोष झाला. टीम इंडियाने करोडो भारतीयांना विजयाचं गिफ्ट दिलं.
भारताच्या या विजयाचा खरा हिरो ठरला तो भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli). विराटने नाबाद 82 धावा करत पाकिस्तानच्या खिशातून विजय अक्षरश खेचून आणला. विराटची ही जिगरबाद खेळी क्रिकेटच्या इतिहासात कायमची लिहिली गेलीय. या विजयानंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
अनुष्काची भावनिक पोस्ट
भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर अनुष्का शर्माने विराटसाठी इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली. अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सामन्याचे काही फोटो अपलोड केले असून विराटचं कौतुक केलं आहे. अनुष्काच्या या पोस्टला लोकांचीही चांगलीच पसंती मिळतेय. आपल्या पोस्टमध्ये अनुष्काने लिहिलंय... सुंदर ! फारच सुंदर ! दिवाळीच्या पूर्वसंध्येला तू लोकांच्या आयुष्यात आनंद द्विगुणीत केला आहेस. तू अद्भूत आहेस... तूझं धैर्य, दृढ संकल्प आणि अढळ विश्वास अलौकिक आहे. मी नुकताच माझ्या आयुष्यातील सर्वात सर्वोत्कृष्ट सामना पाहिला आहे. आपली मुलगी अजून लहान आहे तिला कळणार नाही की आपली आई का नाचतेय, का ओरडतेय? एक दिवस तिला समजेल की तिच्या वडिलांनी एक सर्वोत्तम खेळी केली होती. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे !! तुझासाठी खूप खूप प्रेम ''
कोहलीने दिली प्रतिक्रिया
अनुष्काच्या या पोस्टला प्रचंड लाईक्स आणि कमेंट मिळतायत. आतापर्यंत तब्बल 53 लाख यूजर्सने या पोस्टला लाईक केलं आहे. अनुष्काच्या या पोस्टनंतर कोहलीनेही प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रतेक कठिण काळात माझ्याबरोबर ठामपणे उभी राहिल्याबद्दल धन्यवाद, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'
भारताचा ऐतिहासिक विजय
2021 टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा भारताने 2022 टी20 वर्ल्ड कपमध्ये काढला. सुपर 12 च्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर 4 विकेटने मात केली. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात शान मसूद ( 52 धावा) आणइ इफ्तिकार अहमद (51 धावा) यांच्या जोरावर पाकिस्तानने पहिली फलंदाजी करत 159 धावा केल्या. भारतातर्फे अर्शदीप सिंह आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. याला उत्तर देताना विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने संयमी खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.